वर्ष २०२३ मधील सर्वोत्कृष्ट गेम्स, अॅप्स, खाद्यपदार्थ पाहून झाले. मात्र, सौंदर्य खुलवणाऱ्या मेकअप ट्रेंड्समधील सगळ्यांना आवडलेले प्रकार कोणते आहेत ते आता पाहू. खरे तर हे वर्ष इन्स्टाग्राम, इन्स्टाग्राम रील किंवा अजून इतर सोशल मीडिया माध्यमांसाठी फारच उत्तम ठरले आहे. या वर्षात विविध इन्फ्ल्युएन्सर्सनी आपली एक जागा बनवली आहे. त्यामध्ये अनेक कन्टेन्ट क्रिएटर हे अतिशय सुंदर आणि नवनवीन प्रकारचे मेकअप करून दाखवून नेटकऱ्यांचे मन जिंकत होते. तर काही इन्फ्ल्युएन्सर्स जुनेच मेकअप ट्रेंड्स पुन्हा चर्चेत आणत होते.

२०२३ मध्ये जेन झीपासून ते सेलेब्रिटीजपर्यंत सर्वांच्याच पसंतीचे असलेले हे मेकअप लूक नेमके कोणते आहेत ते जाणून घ्या.

school Annual day function viral video
‘शाळेच्या त्या सोनेरी आठवणी…’ मैदानात सराव, मेकअपसाठी एकच फाउंडेशन अन् बरंच काही; VIRAL VIDEO पाहून आठवेल शाळेतला वार्षिकोत्सव
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Orange Peel Theory What is the Orange Peel Theory Why is this theory trending in 2024
Orange Peel Theory : ऑरेंज पील थेअरी काय आहे? २०२४मध्ये का ट्रेंड होत आहे ही थेअरी?
ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
Best Web Series of 2024
२०२४ मधील गाजलेल्या वेब सीरिजची यादी, तुम्ही पाहिल्यात का ‘या’ कलाकृती?
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा

२०२३ चे ट्रेंडिंग मेकअप लूक

१. स्ट्रॉबेरी मेकअप

त्यामध्ये आपल्या गालांवर, ओठांना आणि डोळ्यांना हलक्या गुलाबी किंवा हलक्या लाल रंगाने मेकअप करायचा असतो. सोशल मीडियावर या स्ट्रॉबेरी मेकअपची चांगलीच चर्चा झाली होती. अनेकांनी हा मेकअप लूक करून त्याचे रील सोशल मीडियावर शेअर केले होते. हलक्या मेकअपमुळे तुमच्या चेहऱ्यावर कोणताही मेकअप नसल्याचा आणि त्वचा नैसर्गिकरीत्या गुलाबी असल्याचा आभास निर्माण होतो. ओठांना एखादे ग्लॉस लावल्याने हा लूक खुलून दिसतो.

हेही वाचा : India ‘Swiggy’d’ in 2023 : २०२३ वर्ल्ड कप फायनलचा दिवस ठरला ‘नॅशनल फूड डे?’ १४ मे, १ जानेवारीला Swiggy च्या ऑर्डर्स पाहून व्हाल चकित…

२. लाटे मेकअप [Latte makeup]

खाद्यपदार्थांवर प्रेम करणारे आपल्या मेकअपमध्येही त्यांचा वापर नक्कीच करू शकतात. मात्र, या मेकअपचे फक्त नाव कॉफीच्या एका प्रकारावरून प्रेरित होऊन ठेवले गेले असून, त्यामध्ये साधारण चॉकलेटी, बेज यांसारख्या रंगांचा वापर केला जातो. त्यामध्ये इतर कोणत्याही रंगाचा वापर होत नाही. ओठांना न्यूड चॉकलेटी लिपस्टिक, डोळ्यांना तुम्हाला आवडतील असे बेज किंवा चॉकलेटी रंगाचे आयशॅडो अशा प्रकारच्या रंगसंगतीचा वापर करून तुम्ही लाटे मेकअप लूक करू शकता. परंतु, यामध्ये गुलाबी, लाल यांसारखे कोणतेही रंग अजिबात वापरू नका.

३. ग्लॉसी लिप्स

मध्यंतरी ओठांवर मॅट लिपस्टिक लावण्याची चर्चा होती. मात्र, आता पुन्हा एकदा आधीसारखे, ओठांवर चमक आणणारे लिप ग्लॉस वापरण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ब्यूटी ब्रॅण्ड्सनीदेखील लिप ग्लॉस सध्या ट्रेंडिंगमध्ये असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती इंडिया टुडेच्या एका लेखामधून मिळते. अनेक कंपन्यांनी, ब्रॅण्ड्सनी या ट्रेंडचा विचार करूनच विविध लिप ऑइल, लिप ग्लॉस यांसारखी उत्पादने बाजारात आणली आहेत.

४. लिप ग्लॉस नेल्स

यंदा लिप ग्लॉस पुन्हा चर्चेत असले तरी आता ते फक्त ओठांपुरते मर्यादित राहिलेले नाही. २०२३ या वर्षात ‘लिप ग्लॉस नखांना’सुद्धा सर्वांकडून पसंती मिळाली असल्याचे समजते. तुमच्या नखांना सुंदर आकार देऊन, त्यावर चमकदार असा रंग लावणे सध्या प्रत्येकाला आवडते आहे.

हेही वाचा : गूगलच्या ‘Near me फीचरचा वापर करून मुलींनी सर्वाधिक ‘ही’ जागा शोधली; पाहा टॉप १० जागांची यादी…

५. क्लाउड स्किन

खरे तर क्लाउड स्किन ही संकल्पना २०२१ मध्येच आली होती. असे असले तरी या वर्षातही तिची चांगलीच चर्चा असल्याचे आपण पाहू शकतो. एवढेच नव्हे, तर यंदा गूगलच्या टॉप मेकअप ट्रेंडमध्येही याने जागा पटकावली आहे. तुम्हाला जर क्लाउड स्किन हा काय प्रकार आहे हे माहीत नसेल, तर हे माहिती करून घ्या की, अशा मेकअपमध्ये चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे चमकदार उत्पादन वापरले जात नाही. मेकअप शक्य तितका सौम्य आणि हलका असा केला जातो.

Story img Loader