आपल्यापैकी अनेकांचा दिवस हा एक कप गरम कॉफी किंवा चहाने सुरु होतो. पण ही दिवसाची योग्य सुरुवात आहे का? पोषणतज्ज्ञ म्हणतात, नाही. सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा चहा किंवा कॉफी पिणं टाळायलाच हवं. त्याऐवजी ड्रायफ्रुटस किंवा एखादं फळ खाऊन केलेली दिवसाची सुरुवात ही सर्वोत्तम असते. दिवस संपताना देखील आपण शेवटचा पदार्थ काय खातो हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी पोषणतज्ज्ञ नमामी अग्रवाल सांगतात कि, एक ग्लास दूध हा दिवस संपवण्यासाठी हे उत्तम पर्याय आहे. तज्ञांनी तर काही खाद्यपदार्थांची एक यादीच केली आहे. ज्यात या पदार्थांच्या पोषणमूल्यांचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी त्या पदार्थांच्या सेवनाची सर्वोत्तम वेळ कोणती? हे देखील नमूद करण्यात आलं आहे. नमामी अग्रवाल यांनी इन्स्टाग्रामवर याविषयी पोस्ट्स केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योग्य वेळी योग्य पदार्थाची निवड

नमामी अग्रवाल म्हणतात कि, “चहा आणि कॉफी ही दोन्ही पेय अशी आहेत ज्यांच्याशिवाय आपला दिवस पूर्णच होऊ शकत नाही. विशेषतः कामाच्या दिवशी चहा आणि कॉफी न घेता राहणं याचा विचार देखील अनेक जण करू शकत नाहीत. परंतु, त्याचं सेवन योग्य वेळी केलं गेलं नाही तर आपल्या शरीरावर आणि स्वास्थ्यावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. त्याचसोबत आपल्या झोपेच्या चक्रात देखील व्यत्यय येऊ शकतो. म्हणून, योग्य वेळी त्याचं सेवन करा जेणेकरून तुम्हाला त्याचे फायदे होतील.”

चहा/कॉफी कधी घ्यावी?

सकाळी चहा/कॉफी घेण्यामागचं प्रमुख कारण असतं तुम्हाला मूड सुधारणं, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अगदी फ्रेश करणं. कारण त्यात कॅफीनचं प्रमाण जास्त आहे. परंतु, एक लक्षात घ्या कि सकाळी उठल्या उठल्या सर्वात पहिल्यांदा चहा/कॉफी घेऊ नका. सकाळी पहिल्यांदा कोमट आणि त्यानंतर एखादं फळ खाऊन थोड्या वेळाने तुम्ही तुमचा चहा किंवा कॉफी पिऊ शकता. यावेळी भिजवलेले बदाम, मनुका किंवा केळी, सफरचंद हे उत्तम पर्याय आहेत. दुसरीकडे, रात्री दुधाचं सेवन उत्तम असं का म्हटलं जातं? ट्रिप्टोफॅन, अमिनो ऍसिड असतं जे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतं. तुम्हाला ह्यामुळे अधिक गाढ, शांत आणि दीर्घकाळ झोप मिळू शकते.

सकाळी/रात्री कोणतं फळ उत्तम?

दुसरीकडे सकाळी सफरचंद खाणं हा एक सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे. कारण ते शरीरातील चयापचय (मेटॅबॉलिझम) वाढवतात आणि पोट साफ करण्यास मदत करतात. तर चेरीजसारखं मेलाटोनिन असलेलं फळ रात्री खावं. चेरीज आपल्याला शरीराच्या घड्याळावर योग्य नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. त्याचसोबत झोपेची गुणवत्ता वाढवण्यास देखील मदत करतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From tea coffee milk apples know best time to have them gst