Hakini Mudra : नियमित योगा करणे हे सुदृढ आरोग्यासाठी चांगले आहे. योगा करण्याचे अनेक फायदे आहेत. योगा हा फक्त शारिरीकदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्यासुद्धा माणसाला निरोगी ठेवतो. अनेकदा आपण शारीरिक आणि मानसिकरित्या खूप निरोगी असतो पण आपल्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते किंवा काही लोकांची स्मरणशक्ती कमी असल्यामुळए मेहनत करुनही त्यांना अपेक्षेप्रमाणे फळ मिळत नाही.आत्मविश्वास आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नेमके काय करावे, हे अनेकांना सुचत नाही. पण योग अभ्यासक मृणालिनी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी आत्मविश्वास आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी एक खास योगा सांगितला आहे.’हाकिनी मुद्रा’ योगा यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो. खरं तर योगापेक्षा याला मुद्रा म्हणता येईल.
‘हाकिनी मुद्रा’ म्हणजे काय?
योग अभ्यासक मृणालिनी यांनी हाकिनी मुद्रा करुन दाखवली आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातांच्या पाचही बोटांचे अग्रभाग एकमेकांना जुळवावे. डोळे बंद करुन कपाळाच्या मध्यभागी मन एकाग्र करावे.नियमित १५ मिनिटे या मुद्रेत ध्यान करावे.नीट समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
अनेकदा या मुद्रेत तुम्ही अनेक दिग्गज लोकांना पाहिले असेल. कधी एलॉन मस्क तर कधी डोनाल्ड ट्रम्प, कधी विराट कोहली तर कधी स्टीव्ह जॉब्स अनेकदा या मुद्रेत दिसतात. त्यांच्या हातांच्या पाचही बोटांचे अग्रभाग एकमेकांना जुळलेले असताना अनेक व्हिडीओत किंवा फोटोमध्ये दिसते.
हेही वाचा : मासिक पाळीदरम्यान खरंच महिलांना विश्रांतीची आवश्यकता आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…
yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “‘हाकिनी मुद्रा’
दोन्ही हातांच्या पाचही बोटांचे अग्रभाग एकमेकांना जुळवून ही मुद्रा करा.
डोळे बंद करून कपाळाच्या मध्यभागी मन एकाग्र करा.
हाकिनी मुद्रेच्या नियमित सरावाने मेंदूची कार्यक्षमता वाढते.
उजव्या आणि डाव्या मेंदू मध्ये सहकार्य वाढून मेंदू अधिक प्रभावी पणे काम करतो.
रोज १५ मिनिटे ही मुद्रा केल्यास फायदा मिळण्यास सुरुवात होईल”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान” तर एका युजरने लिहिलेय, “मी तुमचे व्हिडीओ नियमित बघून योगा करते. मी तुम्हाला पाठीसाठी योगा विचारला होता आणि तुम्ही सांगितला. आता मला चेहऱ्याच्या सुरकुत्यांसाठी योगा सांगा”