Benefits of radish leaves: हिवाळा येताच आपल्या खाण्याच्या सवयी पूर्णपणे बदलतात. विशेषत: या हंगामात अनेक पौष्टिक भाज्या बाजारात उपलब्ध असतात. या भाज्यांपैकी एक म्हणजे मुळा. थंडीच्या दिवसांत लोक मुळ्यापासून विविध पदार्थ बनवतात आणि मुळ्याची पाने फेकून देतात. परंतु, मुळ्याची पाने आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहेत. खरं तर, अनेक बाबतीत मुळ्यापेक्षा त्याची पाने खाणे फायदेशीर ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला मुळ्याच्या पानांचे चमत्कारी फायदे सांगणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुळ्याच्या पानांचे फायदे खालीलप्रमाणे:

वजन नियंत्रणास उपयुक्त

जर तुम्ही शरीराच्या वाढलेल्या वजनामुळे हैराण झाला असाल, तर मुळ्याच्या पानांचे सेवन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या पानांमध्ये आहारामध्ये आवश्यक असणारे फायबर भरपूर प्रमाणात आढळते. त्याच वेळी फायबर थेट लठ्ठपणा प्रभावित करते. फायबरयुक्त गोष्टी खाल्ल्याने तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे जर तुम्हाला स्थूलतेचा त्रास होत असेल, तर तुम्ही मुळ्याच्या पानांना आहाराचा भाग बनवू शकता.

त्वचा संरक्षणासह वृद्धत्व दूर ठेवण्यास मदत

मुळ्याच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म आढळतात; जे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून त्वचेचे संरक्षण करून, वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. त्याशिवाय या पानांमध्ये अ जीवनसत्त्वदेखील मोठ्या प्रमाणात आढळते, जे त्वचेसाठीही फायदेशीर आहे. कारण- अ जीवनसत्त्व पेशींच्या उत्पादनात आणि वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.

हेही वाचा:तुमच्याही मनी प्लांटची पाने पिवळी पडतायत? काळजी घेण्यासाठी ‘या’ टिप्स ठरतील फायदेशीर

शरीर विषमुक्त

मुळ्याच्या पानांचे सेवन केल्याने शरीरातील विषाक्त पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. त्या पानांमध्ये असलेले गुणधर्म हे विषाक्त पदार्थ काढून टाकण्यासाठी प्रभावी आहेत. त्याचा त्वचा, केस आणि एकूणच आरोग्यावर चांगला परिणाम होतो.

रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ

मुळ्याच्या पानांचे सेवन रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासही उपयुक्त ठरते. क जीवनसत्त्व सामग्रीसह मुळ्याची पाने रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात, जी हिवाळ्यातदेखील आवश्यक असते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From weight loss to glowing skin radish leaves are more beneficial sap