कर्करोगावर आता काही प्रमाणात औषधे उपलब्ध होऊ लागली आहेत. पण, मूत्राशयातील कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी आपण स्वतः काळजी घेणे जास्त गरजेचे आहे. फळ आणि भाज्या जास्त प्रमाणात खाण्याने मूत्राशयातील कर्करोगाचा धोका कमी होतो, असा शोध अमेरिकेतल्या संशोधकांनी लावला आहे. संशोधकांनुसार, ज्या महिला फळे आणि भाज्या जास्त प्रमाणात खातात त्यांना मूत्राशयाच्या कर्करोगाचा धोका कमी असतो.
संशोधकांनी मूत्राशयाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या १५२ महिला आणि ४२९ पुरुषांचे निदान केले. ज्या महिलांनी फळे आणि भाज्यांचे जास्त प्रमाणात सेवन केले आहे त्यांना मूत्राशयाच्या कर्करोगाचा धोका सगळ्यात कमी असल्याचे परीक्षणातून समोर आले. पिवळ्या आणि केशरी भाज्यांचे सेवन करणा-या महिलांमध्ये मूत्राशयाच्या कर्करोगाचे प्रमाण ५२ टक्क्यांनी कमी होते. मात्र, फळ-भाज्या सेवनाचा पुरुषांमधील मूत्राशयाच्या कर्करोगावर काहीही परिणाम होत नसल्याचेही परीक्षणाअंती आढळल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
मूत्राशयातील कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी जेवणात जीवनसत्व ए, सी आणि ई चे प्रमाण जास्त असावे, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा