ज्या महिला फळे कमी व फास्ट फूड जास्त खातात त्यांच्यात गर्भधारणा होण्यास खूप वेळ लागतो. किमान वर्षभरात तरी त्या गर्भवती राहू शकत नाहीत असे एका अभ्यासात दिसून आले आहे. संशोधकांनी पहिलटकरणी असलेल्या ५५९८ मातांच्या आहाराचा अभ्यास केला असता त्यांना असे दिसून आले की, ज्या महिलांनी महिन्यात रोज तीनदा ते चारदा फळांचे सेवन केले त्यांच्यात महिनाभरात गर्भधारणा झाली. ज्या महिलांनी फळे महिन्यातून कमी वेळा म्हणजे एक ते तीन वेळा सेवन केली त्यांना गर्भधारणेस एक महिना अधिक लागला. ज्या महिला फास्ट फूड कधीच घेत नव्हते व ज्या महिला आठवडय़ातून चारदा फास्ट फूड खात होत्या त्यांची तुलना केली असता फास्ट फूड न घेणाऱ्या महिलांमध्ये गर्भधारणा एक महिना आधी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या अभ्यासातील आठ टक्के म्हणजे ४६८ जोडपी ही वंध्यत्व असलेली तर ३९ टक्के जोडपी वंध्यत्व नसलेली  होती. ज्या महिला फळे कमी खातात त्यांच्यात वंध्यत्वाची म्हणजे गर्भधारणा न होण्याची शक्यता ८ ते १२ टक्के असते तर ज्या महिला नेहमी फास्ट फूड खातात त्यांच्यात ही शक्यता ८ ते १६ टक्के  असते. फास्ट फूड कमी व फळे जास्त अशी आहार रचना ठेवली तर वंध्यत्वात सुधारणा होऊन गर्भधारणा लवकर होते, असे अ‍ॅडलेड युनिव्हर्सिटीच्या क्लेअर रॉबर्टस यांनी म्हटले आहे. गर्भधारणेसाठी फळे फायद्याची ठरतात तर फास्ट फूड धोकादायक ठरते. फास्ट फूडमध्ये बर्गर, पिझ्झा, फ्राइड चिकन, चिप्स यांचा समावेश होतो. मासे व हिरव्या पालेभाज्यांमुळे गर्भधारणा लवकर होते असे दिसून आलेले नाही.