कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करण्याआधी आपण भगवान गणेशाची पूजा करतो, त्याचे स्मरण करतो. गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते. आपल्या भक्तांच्या मार्गात येणारी विघ्ने तो दूर करतो अशी श्रद्धा आपल्या मनात आहे. आपल्या सर्वांचा आवडता सण गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावर्षी ३१ ऑगस्टला आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. याच निमित्ताने आज आपण जाणून घेऊया, गणपतीची कोणत्या प्रकारची मूर्ती घरी आणावी.

गणपती बाप्पाची मूर्ती कशी निवडावी?

गणपतीची मूर्ती विकत घेताना सर्वप्रथम, ती मूर्ती पीओपी नसावी याची काळजी घ्या. इको फ्रेंडली मुर्त्यांचे विसर्जन करणे अधिक सोपे असते आणि ते पर्यावरणासाठीही सुरक्षित असते. दुसरी गोष्ट म्हणजे गणेशाची बसलेली मूर्ती खरेदी करावी. ते भाग्यवान मानले जाते. याशिवाय श्रीगणेशाची पांढरी आणि शेंदुरी रंगाची मूर्ती शुभतेचे प्रतीक मानली जाते.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Shivsena Eknath Shinde Rebel Winner Candidates List in Marathi
Shivsena Eknath Shinde Rebel Candidates Result : एकनाथ…
Uddhav Thackeray statement at Boisar that why Gujarat inspectors are helpless
गुजरातच्या निरीक्षकांची लाचारी का पत्करतात? उद्धव ठाकरे यांचा बोईसर येथे सवाल
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
bird was happy to see the little girl
चिमुकलीला पाहून पक्षी झाला खूश; एकमेकांची करू लागले नक्कल अन् … पाहा खेळकर पक्ष्याचा VIRAL VIDEO
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक

Ganesh Chaturthi 2022: प्रत्येक गणेशभक्ताने आयुष्यात एकदा तरी ‘या’ मंदिरांना आवर्जून भेट द्यावी; पूर्ण होतील सर्व मनोकामना

गणपती बाप्पाची मूर्ती निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. गणेश चतुर्थीच्या उत्सवासाठी लोकांना फक्त डाव्या बाजूला सोंड असलेली गणेशाची मूर्ती आणण्याचा सल्ला दिला जातो. वास्तविक, डाव्या बाजूला सोंड असणाऱ्या असलेल्या गणपतीला वामुखी गणपती आणि उजव्या बाजूला सोंडे असलेल्या गणपतीला सिद्धिविनायक म्हणतात. सिद्धिविनायकाला सोवळ्याचा आणि कडक गणपती मानले जाते. त्याची पूजा करताना चूक झाल्यास तो शिक्षा देतो असेही म्हणतात. म्हणूनच वामुखी गणपतीची पूजा करणे हे सिद्धिविनायकापेक्षा सोपे आहे. असे म्हणतात, सिद्धिविनायकाची पूजा करताना काही विशेष नियमांचे पालन करावे लागते, जे केवळ मंदिरात किंवा कोणत्याही धार्मिक स्थळावर शक्य आहे. यामुळेच डाव्या बाजूला सोंड असलेला गणपती घरी आणण्याचा सल्ला दिला जातो.

दरम्यान, उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा-उपासना करणे कठीण असते हा निव्वळ एक गैरसमज आहे. ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्या मते, कोणताही देव आपल्या भक्तांना शिक्षा देत नाही. देवाची उपासना करताना मनातील निर्मळ श्रद्धा महत्त्वाची असते. कोणत्याही सोंडेच्या गणपतीची मनोभावे पूजा केल्यास तो आपल्याला आशीर्वादच देतो. त्यामुळे उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करताना मनात भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

गणेशोत्सवाआधीच्या ‘हरतालिका’ व्रताला आहे अनन्यसाधारण महत्त्व; जाणून घ्या या दिवसाची पौराणिक कथा

गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना कोणत्या दिशेला करावी?

श्रीगणेशाची मूर्ती कधीही दक्षिण दिशेला तोंड करून स्थापित करू नये. याशिवाय घराच्या दक्षिण कोपऱ्यात कोणत्याही मूर्तीची स्थापना करू नये. गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी उत्तर-पूर्व म्हणजेच ईशान्य दिशा सर्वोत्तम मानली जाते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)