Ganesh Chaturthi 2023 Aarti Video: भाद्रपद शुक्ल चतुर्थीला म्हणजेच १९ सप्टेंबर २०२३ ला बाप्पा घरी येणार असल्याने महाराष्ट्रातीलच काय जगभरातील गणेशप्रेमी उत्सुक आहेत. ठिकठिकाणी सजावटीच्या कामांनी वेग धरला आहे. प्रसादाची तयारी सुरु झाली आहे. पूजेचं सामन आणून मांडामांड सुरु आहे, हार बनवायला, दिवा ताम्हण घासून पुसून स्वच्छ करायला कंबर कसून तयारी सुरु झाली आहे. आता या सगळ्यात एक तयारी मात्र दरवर्षी राहून जाते आणि ती म्हणजे आरती. मग नेमकं बाप्पांच्या समोर उभं राहिलं की कुठे फळीवर वंदना, दीपक जोशीला नमस्कार, असे विनोदी उच्चार कानी येतात, नाही म्हणायला तुम्ही आरतीची पुस्तकं समोर काढून ठेवली असतील पण आरती म्हणायच्या उत्साहात पुस्तकात आहे तसं उच्चारायचं आपलं भान रहात नाही. खरं पाहायचं तर हा उत्साहच टिकवणं हे सणाचं वैशिष्ट्य आहे पण निदान अर्थाचा अनर्थ होऊ देऊ नये म्हणून हा खास लेख नक्की वाचा.

आज आपण गणपतीच्या, शंकराच्या व देवीच्या आरतीमध्ये सर्रास होणाऱ्या काही चुकांवर नजर टाकूया. जेणेकरून उद्या जेव्हा तुम्ही आरतीला उभे राहाल तेव्हा अडखळायची किंवा चुकीचं काहीतरी म्हणायची वेळ येणार नाही. त्यासाठी हा सोपा तक्ता पाहा..

shiva
Video: “तुला ओझं वाटत नाहीये ना?”, हताश आशूचा शिवाला प्रश्न; नोकरी न मिळाल्याने येणार डोळ्यात पाणी; पाहा प्रोमो
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “माझा सूर्या तुझा नाश…”, सूर्याच्या आईचा डॅडींना इशारा; ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मोठा ट्विस्ट, पाहा
Shiva
“मी शिवाशिवाय कुठेही…”, आईच्या मनाविरुद्ध जाऊन आशूचा स्वत:ला सिद्ध करण्याचा निर्धार; पाहा प्रोमो….
zee marathi lakshmi niwas dalvi family dances on koli song
Video : वसईच्या नाक्यावरी…; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील दळवी कुटुंबाचा कोळी गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले…
Madhugandha Kulkarni passed Hemant dhome movie fussclass dabhade
“आपल्या मातीतल्या गोष्टी….”, मधुगंधा कुलकर्णीने ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचं केलं कौतुक; म्हणाली, “‘ॲनिमल’, ‘पुष्पा’ असे…”
Savlyachi Janu Savli
Video: “या रंगाने…”, एकीकडे तिलोत्तमा सावलीला घराबाहेर काढणार, तर दुसरीकडे देवाची तिच्या आयुष्यात एन्ट्री होणार; पाहा प्रोमो
Shiva
Video : “तुला काहीतरी सांगायचंय…”, शिवाचा विश्वास खरा ठरणार, आशू त्याचे प्रेम व्यक्त करणार; पाहा नेमकं काय घडणार
चुकीचे उच्चारयोग्य उच्चार 
सुखहर्ता दुःखहर्तासुखकर्ता दुःखहर्ता
लंबोदर पितांबर फळीवर वंदनालंबोदर पितांबर फणीवर वंदना
संकष्टी पावावे, निरमा निरक्षावेंसंकटी पावावे निर्वाणी रक्षावे
दास रामाचा वाट पाहे सजणादास रामाचा वाट पाहे सदना
दर्शन म्हात्रे मनदर्शनमात्रे मन कामनापूर्ती
दीपकजोशी नमोस्तुतेदीपक ज्योती नमोस्तुते
क्लेशापासून तोडी तोडी भवपाशाक्लेशांपासूनि सोडवि तोडी भवपाशा
सेतू भक्तालागीते तू भक्तालागी, पावसी लवलाही
ओवाळू आरत्या कुरवंट्याओवाळू आरत्या कुरवंड्या येती
व्याघ्रांबर फणिवरदरव्याघ्रांबर फणिवरधर
लवलवती विक्राळा लवथवती विक्राळा

Video: गणपती बाप्पांची आरती

हे ही वाचा<< हरतालिकेला ‘गजकेसरी राजयोग’ बनल्याने तुमचीही रास होणार श्रीमंत? हत्तीवरून साखर वाटण्याचे दिवस होतील सुरु

दरम्यान, वर म्हटल्याप्रमाणे उत्साह व भक्तांचे प्रामाणिक भाव व ऊर्जा देवबाप्पाला अधिक भावतात त्यामुळे आरती म्हणताना उच्चरांइतकीच वागणूक सुद्धा शुद्ध ठेवावी. तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला लोकसत्ता.कॉमच्या कुटुंबाकडूनही गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!

Story img Loader