Ganesh Chaturthi 2023 Aarti Video: भाद्रपद शुक्ल चतुर्थीला म्हणजेच १९ सप्टेंबर २०२३ ला बाप्पा घरी येणार असल्याने महाराष्ट्रातीलच काय जगभरातील गणेशप्रेमी उत्सुक आहेत. ठिकठिकाणी सजावटीच्या कामांनी वेग धरला आहे. प्रसादाची तयारी सुरु झाली आहे. पूजेचं सामन आणून मांडामांड सुरु आहे, हार बनवायला, दिवा ताम्हण घासून पुसून स्वच्छ करायला कंबर कसून तयारी सुरु झाली आहे. आता या सगळ्यात एक तयारी मात्र दरवर्षी राहून जाते आणि ती म्हणजे आरती. मग नेमकं बाप्पांच्या समोर उभं राहिलं की कुठे फळीवर वंदना, दीपक जोशीला नमस्कार, असे विनोदी उच्चार कानी येतात, नाही म्हणायला तुम्ही आरतीची पुस्तकं समोर काढून ठेवली असतील पण आरती म्हणायच्या उत्साहात पुस्तकात आहे तसं उच्चारायचं आपलं भान रहात नाही. खरं पाहायचं तर हा उत्साहच टिकवणं हे सणाचं वैशिष्ट्य आहे पण निदान अर्थाचा अनर्थ होऊ देऊ नये म्हणून हा खास लेख नक्की वाचा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा