उद्या संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी अनेक जण उपवास करतात, तर अनेक जण आपल्या देवघरातील गणपती बाप्पासाठी खास दुर्वा वाहतात. त्यांची सुंदर आणि लहानशी कंठी बनवली जाते. मात्र, या दुर्वांची अशा काही खास दिवसांमध्ये किंवा गणपतीदरम्यान किंमत वाढवून विक्री केली जाते. परंतु, तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरी एका कुंडीमध्ये या दुर्वा उगवता येऊ शकतात.

यासाठी त्यांना कुंडीत कसे लावावे इथपासून ते त्यासाठी खत कसे तयार करायचे आणि किती सूर्यप्रकाश देण्याची गरज असते, याची सर्व माहिती युट्यूबवरील SP GARDENING MARATHI या चॅनेलने एका व्हिडीओमार्फत शेअर केली आहे. काय आहेत या सोप्या आणि उपयुक्त टिप्स जाणून घ्या.

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
How to use banana peel for mosquito
घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट

हेही वाचा : Cleaning hack : केवळ २० रुपयांमध्ये बाथरूममधील नळ होतील चकाचक! केवळ ‘ही’ वस्तू वापरून करा सोपा जुगाड

घरी दुर्वा कशी उगवावी?

रस्त्याच्या कडेला गवत असणाऱ्या भागामध्ये किंवा बागेत या दुर्वा सहज सापडतात. अशा दुर्वा नजरेस पडल्या तर त्यांना मुळासकट उपटून घरी घेऊन या आणि घरामधील कुंडीत पुन्हा व्यवस्थित लावून त्याला पाणी घाला. एकदा कुंडीत दुर्वा लावल्यानंतर त्यांचे पुन्हापुन्हा रोपण करावे लागत नाही. उन्हाळा असो किंवा हिवाळा, कोणत्याही ऋतूमध्ये यांची वाढ चांगली आणि वेगाने होत असते. यांची देखभाल करणेदेखील अत्यंत सोपे असते.

या दुर्वांचे रोपण करण्यासाठी एखाद्या पसरट कुंडीचा किंवा डब्याचा वापर करा. दुर्वा सतत वाढत असतात, त्यामुळे पसरट कुंडीचा वापर केल्यास त्यांना पसरत जाण्यास मदत होते.
दुर्वा लावताना माती भुसभुशीत असणे गरजेचे असते. माती जर चिकट असेल तर त्यामध्ये दुर्वांची अपेक्षित वाढ होणार नाही.
इतर रोपांप्रमाणे दुर्वांना दररोज पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नसते. आठवड्यातून एकदा किंवा फार फारतर दोनदा पाणी घातले तरीही पुरेसे असते.
सूर्यप्रकाशाबद्दल सांगायचे तर दुर्वांना सावलीमध्ये, थोड्याश्या उन्हात किंवा भरपूर सूर्यप्रकाश असणाऱ्या जागांवर ठेवता येऊ शकते. कोणत्याही वातावरणामध्ये त्यांची उत्तम वाढ होत असते.

दुर्वांना कोणती खते घालावी?

दुर्वांची खरंतर विशेष काळजी घ्यावी लागत नाही. त्यामुळे नियमित किंवा ठराविक खाते घालणे गरजेचे नसते. मात्र, तुमच्याकडे शेणखत उपलब्ध असल्यास त्याचा वापर तुम्ही करू शकता. तसेच आपल्या घरातदेखील काही वस्तू आहेत, ज्यांपासून अगदी सहज घरगुती खत तयार करता येते. सर्वात सोपा पर्याय म्हणजे चहा पावडर.

हेही वाचा : Car tips : दुर्गंधी, घाण वास दूर करतील कॉफीच्या बिया; पाहा सुगंधी गाडीसाठी ‘स्वस्तात मस्त’ अशा टिप्स….

चहा पावडरपासून घरगुती खत कसे तयार करायचे ते पाहा.

  • सगळ्यात पहिले एका भांड्यात पाणी घ्यावे. त्यामध्ये अर्धा चमचा चहा पावडर घालून रात्रभर तसेच ठेवा. रात्रभर पावडरमधील पोषक तत्वे पाण्यात मिसळण्यास मदत होते.
  • दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचा रंग बदललेला असेल. आता त्यामध्ये अजून दोन भांडी साधे पाणी मिसळून घ्या.
  • आता चहापासून तयार झालेले खत दुर्वांमध्ये घालून घ्यावे. हा प्रयोग महिन्यातून एकदा केला तरीही चालू शकते.
  • या ऐवजी आपण डाळ किंवा तांदूळ धुतल्यानंतरचे पाणी टाकून देतो, तेसुद्धा दुर्वांमध्ये खत म्हणून घालू शकता.

चहाच्या पाण्याचे होणारे फायदे :

चहा पावडर ही रोपांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त असते. चहाच्या पावडरमध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा फायदा झाडाच्या पानांना होतो. ती अधिक हिरवीगार आणि घनदाट होण्यास मदत होते. मात्र, या खताचा वापर प्रमाणातच करावा असा सल्ला व्हिडीओमध्ये दिला आहे.