एड्सवर उपाय म्हणून शोधण्यात आलेली एक लस एचआयव्हीला पूर्णत: नष्ट करण्यात यशस्वी ठरली आहे. एका नव्या संशोधनात या लसीसंदर्भात हा दावा करण्यात आला आहे. लंडन येथील किंग्स महाविद्यालयात या लसीचा शोध घेण्यात आला आहे. एडसवर उपाय म्हणून शोधण्यात आलेल्या या लसीमध्ये एडस् पसरवणाऱ्या व्हायरसला निकामी करण्याची क्षमता असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
मनुष्यामध्ये आढळणाऱ्या एचआयव्हीप्रमाणेच इतर एसआयव्ही व्हायरसवरदेखील ही लस उपाय ठरू शकते का? याविषयी परिक्षण सुरू आहे. यासंबंधीचे परीक्षण माकडांवर करण्यात आले असून लवकरच हा प्रयोग मनुष्यावरही करण्यात येणार आहे. संचालक लुईस पिकर यांच्या म्हणण्यानुसार, अजूनपर्यंत एचआयव्ही संक्रमणावर इलाज खूप कमी रुग्णांवर होऊ शकला आहे. ज्यामध्ये एचआयव्ही संक्रमित व्यक्तीला अॅन्टी व्हायरल औषधं संक्रमणानंतर काही वेळेतच दिली गेली किंवा ज्यांनी कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सेल ट्रान्सप्लान्ट केले. या नव्या शोधामुळे अशी आशा निर्माण झाली आहे की या लसीमुळे प्रतिरोधक क्षमतेच्या प्रक्रियेत शरिरात एचआयव्हीला मुळापासून नष्ट करण्याची क्षमता असू शकते.
संशोधनासाठी पिकर यांनी सायटोगेलोवायरस किंवा सीएमव्ही यांचा वापर केला. हा व्हायरस मोठ्या प्रमाणात आढळून येतो. सीएमव्ही आणि एसआयव्ही यांचा एकमेकांशी संबंध एक वेगळाच प्रभाव ठरतो, असं शोधकर्त्यांच्या लक्षात आले आहे. ‘इफैक्ट मेमोरी’चे टी सेल एसआयव्ही संक्रमित पेशींना शोधून काढून त्यांना नष्ट करण्यात यशस्वी ठरतोय. हे संशोधन ‘नेचर’ या पत्रिकेत प्रकाशित करण्यात आले आहे.
एड्सवर मारक ठरणा-या लसीचा शोध
एड्सवर उपाय म्हणून शोधण्यात आलेली एक लस एचआयव्हीला पूर्णत: नष्ट करण्यात यशस्वी ठरली आहे.
First published on: 21-09-2013 at 12:15 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gene discovery could lead to new hiv treatments