लहान वयामध्ये मुलांच्या लठ्ठपणास कापणीभूत असणारे जनुक सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. हे जनुक मेंदूमध्ये निर्माण होत असून, मुलांमध्ये, प्रामुख्याने लहान मुलींमध्ये त्यामुळे लठ्ठपणा व काहीतरी चटपटीत खाण्याकडे ओढ निर्माण होत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.
केवळ आहारमूल्य नसलेले अन्न खाण्यात आल्यामुळे लठ्ठपणा येतो असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, लठ्ठपणाला इतरही गोष्टी कारणीभूत असल्याचे या अभ्यासकांनी म्हटले आहे. जनुकीय प्रकृती, वातावरणातील तणाव आणि भावनिक संवर्धन या बाबी देखील लठ्ठपणाला कारणीभूत ठरत असल्याचे या अभ्यासकांनी म्हटले आहे.
या बाबी उघड झाल्यामुळे काही मुले लहानपणीच का लठ्ठ होतात व लठ्ठपणा होऊ नये म्हणून काय उपचार करता येतील यावर संशोधन करता येणार असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.        
“स्पष्ट सांगायचे झाल्यास आम्ही लठ्ठपणा हा जनुकीय कारणामुळे येत असून, सुरूवातीच्या काळातील लठ्ठपणातील वाढ व त्याचे मुलांवर होणारे परिणामांपर्यंत पोहचलो आहेत, ” असे या संशोधकांमधील प्रमुख अभ्यासक, मॅकगिल विद्यापीठाचे प्राध्यापक मिखेल मिअनी यांनी सांगितले.    
या संशोधकांनी एका गरीब निराशाग्रस्त गर्भवती महिलेवर अभ्यास केला. ही महिला गर्भवती असल्यापासून तर त्यामहिलेचे मुल दहा वर्षांचे होई पर्यंत या शास्त्रज्ञांनी या अभ्यासाचा पाठपुरावा केला. चार वर्षे वयाच्या १५० मुलांचा देखील या दरम्यान अभ्यास करण्यात आला. त्या मुलांच्या पालकांकडून प्रश्नावली देखील भरून घेण्यात आल्या. मिळोलेल्या माहिती वरून व निरीक्षणांवरून या शास्त्रज्ञांनी मुलांच्या लठ्ठपणाचे विश्लेषण करणाऱ्या नोंदी केल्या आहेत.   

Story img Loader