पुरूषांच्या छातीमध्ये संप्रेरकाचे काम करणाऱ्या व कर्करोगापासून संरक्षण देणाऱ्या जनुकांचा जनन क्षमतेवरही परिणाम होत असल्याचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.
पश्चिम ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या (य़ूडब्ल्यूए) वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (डब्ल्यूएआय्एम्आर्) शास्त्रज्ञांनी हाती घेतलेल्या एका संशोधनामध्ये ‘एसएलआयआर’ या जनुकाचा शोध लागला.
‘डब्ल्यूएआयएमआर’च्या प्रयोगशाळेमध्ये पश्चिम ऑस्ट्रेलिया विद्यापीठाचे प्राध्यापक पिटर लिंडमन यांच्या नेतृत्वाखालील कर्करोगावरील औषधावर संशोधन सुरू आहे. या संशोधन गटातील सहायक प्राध्यापक शेन कॉली यांना प्रयोगशाळेमध्ये ‘एसएलआयआर’रहित उंदीर सापडला. सामान्य उंदरापेक्षा ‘एसएलआयआर’ जनुक असणाऱ्या उंदरामध्ये कार्यक्षम शुक्रजंतूचे प्रमाण एक तृतियांश जास्त असल्याचे आढळले.
संशोधकांनी सामान्य मादी उंदीर व ‘एसएलआयआर’ जनुक असलेल्या उंदरामध्ये संबंध घडवून आणला. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीच्या आधारे ‘एसएलआयआर’रहित शुक्रजंतूंचा अभ्यास करण्यात आला. त्या शुक्रजंतूंच्या मधल्या भागातील रचनेमध्ये शास्त्रज्ञांना विस्कळीतपणा दिसून आला. या विस्कळीतपणामुळे या शुक्रजंतूंची गती मंदावली असल्याचा निष्कर्ष पुढे आला.
पुढे माणसावरील अभ्यासातून, जर ‘एसएलआयआर’ जनुकांची निर्मिती थांबल्यास जनन क्षमता कमी होण्याचे ते एक कारण ठरू शकते असा निष्कर्ष निघाला. या संशोधनामुळे पुरूषांमध्ये असणाऱ्या ‘एसएलआयआर’ जनुकांच्या प्रमाणातून काही जोडप्यांना मुले का होत नाही, याचे उत्तर मिळणे सोपे होणार आहे.
“हे संशोधन नैसर्गिकरित्या गर्भधारणा न होणाऱ्या जोडप्यांसाठी महत्वाचे ठरणार आहे. आमच्या अभ्यासातून ‘एसएलआयआर’ जनुकांचा पुरूषांमधील जनन क्षमतेमधील परिणाम समोर आल्यावर पुढील उपचारांना मदत होणार आहे.”, असे लिंडमन म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा