दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी अगदी जवळ आली आहे. या दिवाळीत स्वत:ला सुंदर बनवण्यासाठी ड्रेसिंग आणि ऍक्सेसरीझिंग पुरेसे नाहीये, तर चमकदार त्वचा असणेही आवश्यक आहे. बदलत्या ऋतूमध्ये त्वचेमध्ये अनेक बदल होतात ज्यामुळे आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव बनते. हे बदल आहार आणि खाण्याच्या सवयींमुळे होतात, ज्यामुळे चेहऱ्याची सर्व चमक हरवत राहते. आता दिवाळी जवळ आल्याने त्वचेकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. बदलत्या ऋतूमध्ये त्वचेमध्ये कोरडेपणा वाढतो आणि त्वचेची चमक कायम राहते, अशा परिस्थितीत त्वचेची काळजी घेण्यासाठी आतापासून दिवाळीपर्यंत आहारात हे पाच बदल करा, तुमची त्वचा दिसेल चमकदार.
त्वचेसाठी आहारात ताज्या फळांचा समावेश करा:
जर तुम्हाला त्वचेचा कोरडेपणा दूर करायचा असेल, तसंच त्वचा सुधारायची असेल, तर आहारात व्हिटॅमिन-ए, सी आणि व्हिटॅमिन ई-सी समृद्ध फळांचा समावेश करा. हंगामी ताजी फळे तुमच्या त्वचेला पुरेशी प्रथिने आणि जीवनसत्त्वे देतात.
साखरेचे सेवन कमी करा:
साखरेचे सेवन मर्यादित करा. कमी साखरेचे सेवन केल्याने इन्सुलिनची पातळी कमी राहते, ज्यामुळे पेशी निरोगी संतुलन राखण्यास मदत करतात.
तळलेल्या पदार्थांचा सेवन कमी करा:
तळलेल्या पदार्थांचे सेवन कमी करा. तळलेले आणि गोड पदार्थांमुळे वजन वाढते, तसेच त्वचा निस्तेज दिसते. तळलेले अन्न त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. दिवाळीपर्यंत त्वचेत चमक आणायची असेल, तर आतापासूनच तुमच्या आहारात सुधारणा करा.
शरीर हायड्रेटेड ठेवा
त्वचेला टवटवीत ठेवायचे असेल तर त्वचा हायड्रेट ठेवा. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी, दररोज भरपूर पाणी प्या, जर जास्त नसेल तर दिवसातून किमान ८ ग्लास पाणी प्या. याशिवाय आहारात टरबूज, काकडी, संत्री, स्ट्रॉबेरी आणि द्राक्षे यांसारखी पाणीयुक्त फळे आणि भाज्यांचे सेवन करा.
पुरेशी झोप देखील महत्वाची आहे:
तुमची त्वचा चमकदार होण्यासाठी दररोज रात्री किमान८ तास झोपण्याचा प्रयत्न करा. आपल्या शरीराप्रमाणे आपली त्वचा देखील थकते आणि ती सैल होते. जर तुम्हाला तुमची त्वचा नैसर्गिकरित्या शांत आणि सुंदर ठेवायची असेल, तर रात्री योग्य झोप घ्या.
(टीप : वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)