मुरुम व पुरळ हे त्वचेच्या सर्वात सामान्य समस्यांपैकी एक आहे. अनेकदा आपल्या चेहऱ्यावर मुरुमे दिसतात, पण कधी कधी अनेकांच्या अंगावर पुरळ येतात. दरम्यान पुरळ तेव्हा उद्भवते जेव्हा त्वचेची लहान छिद्रे, म्हणजेच फॉलिकल्स किंवा केस फॉलिकल्स हे ब्लॉक होतात.

सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला, ज्यांनी कतरिना कैफ, वाणी कपूर आणि सोफी चौधरी सारख्या इतर अनेक सेलिब्रिटींना प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी अलीकडेच त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ‘अनुवांशिक, हार्मोनल असंतुलन, तेल मसाज, वर्कआउट किंवा घाम येणे, प्रोटीन सप्लिमेंट्स आणि अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स’ असे शरीरावर येणारे मुरुम तसेच पुरळ येण्याची मुख्य कारणे सांगितली आहेत.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल

कारण

शरीरावर जास्त तेल ग्रंथी, अतिरिक्त मृत त्वचेच्या पेशी आणि मुरुमांना कारणीभूत ठरणारे बॅक्टेरिया ज्यामुळे मुरुम येतात. जेव्हा तेल आणि मृत त्वचेच्या पेशी त्वचेच्या फॉलिकल्समध्ये किंवा छिद्रांमध्ये अडकतात, तेव्हा तुमच्या त्वचेवर पुरळ येण्याची समस्या निर्माण होते. तसेच भरपूर घाम येणार्‍या लोकांमध्ये शरीरावर पुरळ व मुरूम येण्याचे प्रमाण अधिक असते. त्याचबरोबर गर्भधारणा आणि पेरीमेनोपॉज यांसारखे शरीरात होणार्‍या तीव्र हार्मोनल बदल त्वचेवर पुरळ वाढवू शकतात. कारण या हार्मोनल बदलाच्या काळात तेल ग्रंथी जास्त सक्रिय होतात.

उपाय

सॅलिसिलिक ऍसिड किंवा ग्लायकोलिक ऍसिड सारखी हायड्रॉक्सी ऍसिड असलेली उत्पादनाचा वापर करा. कारण हे त्वचेवरील पुरळांवर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरते.

अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड जसे की ग्लायकोलिक ऍसिड किंवा लैक्टिक ऍसिड असलेले उत्पादन निवडा. अल्फा हायड्रॉक्सी ऍसिडस् त्वचेला सावरण्यास मदत करतात तर त्वचा जलद एक्सफोलिएट करतात आणि त्वचेची छिद्रे बंद करतात. याने पुरळांच्या समस्येपासून मुक्तता मिळते.

हायड्रॉक्सी ऍसिड किंवा बेंझॉयल पेरोक्साइड असलेले बॉडी वॉश वापरा. जे मृत त्वचा आणि बॅक्टेरिया दूर करण्यास मदत करेल.

Hair Oil Tips : तुम्हीही केसांना लावण्यासाठी गरम तेलाचा वापर करता का? जाणून घ्या याचे फायदे-तोटे

औषधीय उपचारासाठी तुम्ही लोशन किंवा स्प्रे वापरा. त्वचा जास्त कोरडी पडू नये म्हणून सॅलिसिलिक ऍसिड असलेले उत्पादन निवडा.

त्वचातज्ञ यांच्याशी सल्ला घेतल्यानंतर व्हिटॅमिन ए पासून मिळणारे रेटिनॉइड्स वापरा. हे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स काढण्यास आणि छिद्रे बंद होण्यास मदत होते.

व्यायामानंतर किंवा घाम आल्यानंतर शक्य तितक्या लवकर तुमचे जिमचे कपडे काढा आणि अंघोळ करा.

तुमच्या शरीराला एक्सफोलिएट करा कारण ते त्वचेच्या पेशींना एक्सफोलिएट करण्यास आणि त्वचेच्या छिद्रांना बंद करण्यास मदत करेल. हे शरीरातील मुरुमांचा आकार आणि तीव्रता कमी करते आणि भविष्यात पिंपल्स, व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्स दिसण्यापासून रोखण्यास मदत करते.

कोरड्या त्वचेमुळे त्वचेची जळजळ होऊ शकते, ज्यामुळे शरीरावर पुरळ येऊ शकते. आंघोळ केल्यानंतर, नॉन-कॉमेडोजेनिक लोशनने तुमच्या शरीराला मॉइश्चरायझ करा.

सॅलिसिलिक ऍसिड किंवा बेंझॉयल पेरोक्साइडसह मुरुमांविरूद्ध लढणारा साबण देखील वापरू शकता.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.)