स्वयंपाकघर कितीही स्वच्छ ठेवले तरी आपल्या ओट्यावर, गॅस शेगडीजवळ, सिंकमध्ये ‘कुणीतरी’ आपली वाट बघत बसलेले असते. आपण जेव्हा काही वस्तू घेण्यासाठी स्वयंपाकघरातील एखादा खण उघडतो तेव्हा आपल्यासमोरून लाल रंगाचे, काटेरी पायांचे व लांब मिशा असणारे झुरळ अगदी ऐटीत तुरुतुरु करीत निघून जाते आणि त्याला बघताच आपली चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. आता काहींच्या घरी आकाराने अगदी लहान अशी भरपूर झुरळे होतात. त्यांच्या भांड्यांच्या ट्रॉलीच्या खणात किंवा ड्रॉवर्समध्ये आणि ओट्यावर ती अगदी सर्रास फिरत असतात.

या झुरळांचा वावर आपल्या सर्व भांड्यांवर, वस्तूंवर, हात पुसण्यासाठी ठेवलेल्या टॉवेलवरदेखील होत असतो. अशा वेळेस घरी पाहुणे आले किंवा अगदी जवळची व्यक्ती जरी आली तरी स्वयंपाकघरातील झुरळांचा हा सुळसुळाट दिसायला किती वाईट दिसतो आणि ते बघून शिसारी येते नाही का? आता काहींना ओटा किंवा स्वयंपाकघर स्वच्छ ठेवायची सवय नसते. चहाचे डाग किंवा खरकटी भांडी जर तशीच पडून असतील, तर अर्थातच या प्रकारच्या सगळ्या गोष्टी या किटकांना, पालींना खासकरून झुरळांना आकर्षित करतात; पण जे अगदी टापटीप राहतात, वेळच्या वेळी स्वयंपाकघरात सफाई करतात त्यांच्याकडेसुद्धा अचानक ही झुरळे येतात, त्याचे काय? आता हे असे का ते त्या किड्यांनाच माहिती. पण कितीही कीटकनाशके वापरा, काहीही करा थोड्या वेळेसाठी त्याचा उपयोग होतो; पण नंतर पुन्हा तीच परिस्थिती. अशा वेळेस काय करायचे, हा प्रश्न पडतो.

Aloo Bhujia Recipe
आलू भुजिया बनवण्याची सोपी रेसिपी नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
air quality deteriorated in pune city due to diwali firecracker
शहरभर फटाक्यांची तुफान आतषबाजी… हवेची गुणवत्ता खालावली…
Diwali faral recipe garlic sev lasun shev recipe in marathi lasun shev easy recipe
२ कप बेसन वापरून सोप्प्या पद्धतीने बनवा कुरकुरीत लसूणी शेव; फराळाची मजा वाढवेल ‘लसूण शेव’
Make malpuwa at home
घरच्या घरी ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा मालपुवा; वाचा साहित्य आणि कृती
puri making tips
सणासुदीला टुमदार, लुसलुशीत पुरी बनवायची आहे? ‘या’ महत्त्वाच्या टिप्स करा फॉलो
Snehal Tarde
“तिथल्या स्वयंपाकघराचा वास….”, स्नेहल तरडे यांनी सांगितले की, शहरातल्या घरात चूल का तयार केली?
Chinese Water burning lamp demand in this diwali festival
काय सांगता! हे दिवे पाण्याने जळतात…

हेही वाचा : भांडी आवडली म्हणून उगाच पैसे खर्च करू नका; स्वयंपाक घरातील वस्तू घेण्याआधी ‘या’ पाच टिप्स पाहा

या प्रश्नाचे उत्तर इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @masteringhacks नावाच्या हॅण्डलरकडे आहे. त्याने घरातील केवळ दोन गोष्टी वापरून, झुरळांना पळवून लावणारा एक घरगुती स्प्रे बनवला आहे. तो कसा बनवायचा ते तुम्हीही पाहा.

झुरळांना घालवण्यासाठी DIY स्प्रे पाहा

साहित्य

४-५ कापूर
४ उदबत्त्या
पाणी
स्प्रे बाटली

कृती

सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये भांडेभर पाणी घेऊन, ते पातेले गॅसवर ठेवा. आता त्यामध्ये चार उदबत्त्या आणि चार-पाच कापूर कुस्करून टाका. आता हे मिश्रण काही मिनिटे व्यवस्थित उकळून घ्या. त्यानंतर हे मिश्रण एका ग्लासमध्ये काढून घ्या. आता एक स्वच्छ स्प्रेची बाटली घेऊन, त्यामध्ये तयार मिश्रण ओतून बाटलीचे झाकण घट्ट बंद करावे. बघा, तुमचा झुरळांना पळवून लावणारा घरगुती स्प्रे तयार आहे.

हेही वाचा : डाळ बनवताना कधीही विसरू नका ‘या’ चार स्टेप्स; पहिल्यांदाच स्वयंपाक करीत असाल, तर लक्षात घ्या या टिप्स

या स्प्रेचा वापर कसा करावा?

आपला ओटा आणि सिंक साफ नसल्यास, तो व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. आता गॅसजवळ, तुमच्या भांडी ठेवण्याच्या ट्रॉली आणि ड्रॉवरच्या खालच्या भागावर, सिंक व सिंकचा पाइप असतो तिथेही हा स्प्रे मारावा.

@masteringhacks याने शेअर केलेल्या या सोप्या कृतीच्या हॅक व्हिडीओला आजपर्यंत ३.३ मिलियन व्ह्युज मिळाले आहेत.