Bad Breath Remedy: श्वासाची दुर्गंधी ही एक सामान्य समस्या आहे. जिच्यामुळे अनेक लोक त्रस्त असतात. अनेकदा तोंडाची साफसफाई योग्य प्रकारे न केल्यामुळे किंवा संसर्गामुळे व्यक्तीला तोंडाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तोंड व्यवस्थित स्वच्छ न केल्याने किंवा तोंडाच्या इतर दीर्घ आजारांच्या लक्षणांमुळे ही दुर्गंधी येऊ शकते. जर तुम्ही तोंडाच्या दुर्गंधीमुळे हैराण असाल तर अशा परिस्थितीत दुर्गंधी दूर करण्यासाठी काही टिप्स तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात.
आपले मौखिक आरोग्य ठेवा सुदृढ!
आपले मौखिक आरोग्य आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. असे मानले जाते की, तोंड आपल्या सामान्य आरोग्याचा आरसा आहे. अनेकदा आपल्या जीभेवर, दातांवर आणि हिरड्यांवर जमा झालेले जिवाणू लाळेसोबत मिळून आपले अन्न आणि प्रथिने नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. या प्रक्रियेमध्ये जो वायू बाहेर पडतो, त्यामुळे आपल्या श्वासांमध्ये दुर्गंधी निर्माण होते. या दुर्गंधीला हॅलिटोसिस असे म्हणतात. दुसरे कारण म्हणजे, कोरड्या तोंडामुळे, लाळेचा प्रवाह हा अधिक प्रभावित होतो. लाळेच्या कमतरतेमुळे आपल्या तोंडामध्ये बॅक्टेरिआ तयार होतात. जे सतत सल्फर कंपाऊंड्स सोडतात आणि यामुळे श्वासातून दुर्गंधी देखील येते. जर तोंडाची ही दुर्गंधी वाढत असेल तर ते एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण देखील असू शकते.
आणखी वाचा : Yoga For Winters: हिवाळ्यात करा हे ५ योगासने; आरोग्यासाठी ठरतील अतिशय फायदेशीर!
श्वासामधून दुर्गंध का येतो ?
१. तोंडाची स्वच्छता चांगल्या प्रकारे न करणे
२. चुकीचे खाद्यपदार्थ खाण्याच्या सवयींमुळे.
३. अनेकदा लाळ ग्रंथींमुळेही श्वासाची दुर्गंधी येते.
४. तोंडाचा अल्सरमळे दुर्गंध येतो.
५. हिरड्यांमध्ये पू झाल्यामुळे
६. आतड्यांमध्ये अन्न सडणे
७. नाकाऐवजी तोंडाने श्वास घेण्याची सवय असल्यामुळे.
८. दातांमध्ये पायोरिया झाल्यामुळे श्वासाची दुर्गंधी येते.
९. जर दात आणि हिरड्यांमध्ये संसर्ग झाला असला तरी दुर्गंधी निर्माण होते.
१०. जर तुमची पचनसंस्था नीट काम करत नसेल तर, तोंडातून दुर्गंधी येते.
आणखी वाचा : Kitchen Tips: आलं आणि लसणाची पेस्ट जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी जाणून घ्या ‘या’ सोप्या टिप्स
‘अशी’ करा श्वासाची दुर्गंधी दूर
१. एखाद्याने आपले तोंड पूर्णपणे स्वच्छ केले पाहिजे. घाईत कधीही ब्रश करू नकात. त्यामुळे तोंडाला दुर्गंधी येऊ लागते.अशा परिस्थितीत योग्य प्रकारे साफसफाई करून या समस्येवर मात करता येते.
२. कॅविटी किंवा संसर्गामुळे तोंडातून दुर्गंधी येते.अशा परिस्थितीत,या समस्येवर मात करण्यासाठी व्यक्तीने त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
३. लवंगाच्या वापरानेही तोंडाचा वास दूर केला जाऊ शकतो.अशा स्थितीत तुम्ही दिवसातून एक किंवा दोन लवंगा चघळाव्यात.
४. तुळशीच्या पानांच्या सेवनानेही तोंडाचा वास दूर होतो.तुळशीची पाने चांगली धुवून चावून खा.
५. पेरूची पाने चघळल्यानेही तोंडाचा वास दूर होतो.
६. बडीशेपच्या सेवनाने तोंडाला येणारा वासही थांबतो.तुम्ही बडीशेपसोबत साखरेचे सेवन करू शकता.
खाण्याच्या वाईट सवयींपासून दूर राहा!
तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी आपण जे अन्न खातो ते महत्त्वाचे असते. शर्करायुक्त, चिकट आणि आम्लयुक्त अन्न दातांना लवकर खराब करते. धुम्रपान आणि तंबाखूचे सेवन देखील दातांच्या समस्या आणि तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका वाढवू शकतो. तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी अशा सवयी टाळणे केव्हाही चांगले.