How To Get Rid Of Dandruff Permanently: अलीकडे धूळ- प्रदूषणामुळे केसाचे एक ना अनेक त्रास सुरु झाले आहेत. पण एक अशी समस्या आहे जी वर्षानुवर्षे आपल्या आज्या, आया, काकी, मामी, ताई सगळ्यांना त्रास देत आहे आणि ती म्हणजे केसातील कोंडा. स्त्रियाच नव्हे तर पुरुषही अनेकदा या कोंड्याने त्रस्त असतात. वेळीच उपाय न केल्यास हा कोंडा पूर्ण डोक्यात पसरू शकतो. यामुळे टाळूवर एक मृत त्वचेचा व धुळीचा थर तयार होऊ शकतो जो केसाच्या मुळांना धरून राहू शकतो. यामुळे केसाची वाढ खुंटणे, टाळूला खाज सुटणे, कोरडेपणा जाणवणे असे त्रास वाढू शकतात. आज आपण अर्बन कंपनी चेन्नई येथील हेड डर्मेटोलॉजिस्ट डॉ. बन्सरी दावडा, यांनी HT ला कोंडा कमी करण्यासाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डॉ. बन्सरी दावडा सांगतात की, डोक्यातील केसांच्या कूपांच्या तळाभोवती मालासेझिया नावाचे यीस्ट तयार झाल्यामुळे ही समस्या उद्भवते. अस्वच्छ टाळू या यीस्टला म्हणजेच बुरशीला अन्न पुरवते, ज्यामुळे कोंडा होतो. म्हणून कोंडा दूर ठेवण्यासाठी टाळूची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे.

कोंडा घालवण्यासाठी शॅम्पू कसा निवडाल? (How To Choose Anti- Dandruff Shampoo)

केटोकोनाझोल किंवा झिंक पायरिथिओन किंवा सेलेनियम सल्फाइड किंवा पिरोक्टोन ओलामाइन असलेले शॅम्पू निवडा. तुम्हाला हे सगळे घटक माहित असतीलच असे नाही पण निदान शॅम्पूची खरेदी करताना वाचून घ्या. केस धुताना कमीतकमी ५-१० मिनिटे मसाज करून मग पूर्णपणे धुवून स्वच्छ करा. अँटी-डँड्रफ शॅम्पू आठवड्यातून २ ते ३ वेळा वापरायला हवा.

कोंडा घालवण्यासाठी डाएट (Anti- Dandruff Diet Plan)

फास्ट फूड, साखर आणि इतर उच्च प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने यीस्टच्या अतिवृद्धीला प्रोत्साहन मिळते आणि कोंडा वाढू शकतो. व्हिटॅमिन बी, झिंक, प्रोबायोटिक्सने समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश केल्यास डोक्यातील कोंडा टाळण्यास मदत होते. अंबाडीच्या बिया, अंडी, शेंगदाणे, शेंगा, केळी, फॅटी फिश आणि दही आहारात समाविष्ट करा.

सर्वात मोठा गैरसमज म्हणजे तेल…

१) केसांना तेल लावल्याने कोंडा कमी होण्यास मदत होणार नाही. खरं तर, तेल लावल्याने तुमचा कोंडा वाढू शकतो. कारण तेल टाळूवर बुरशीचे पोषण करू शकते. त्यामुळे केसांना तेल लावून जास्त वेळ ठेवू नका व सतत तेल लावून ठेवणे टाळा.

२) केस धुण्यासाठी एक ठराविक पद्धत वापरा. तुम्ही कोणता शॅम्पू वापरता याइतकेच तुम्ही किती वेळा व किती सातत्याने हा शॅम्पू वापरता हे ही महत्त्वाचे आहे. त्यामुळे ड्राय शॅम्पू, हेअर स्प्रे आणि इतर हेअर स्टाइलिंग सगळं वापरण्यापेक्षा एक ठराविक रुटीन निवडा.

हे ही वाचा<< एका महिन्यात केस वाढवणारे तांदळाचे पाणी कसे बनवाल? हजारो रुपये वाचवा, घरीच असा करा हेअर स्पा

दरम्यान, तणाव हे अनेक रोगांचे एक प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे कोंडा देखील होऊ शकतो. तणावामुळे, शरीर बुरशीजन्य संसर्गास कमी प्रतिरोधक बनते, आणि त्यामुळे कोंडा विरुद्ध लढण्याची क्षमता देखील कमी होते. म्हणून आनंदी राहा.