Moths Inside Your House: देशभरात मान्सूनने हजेरी लावली आहे पण या काळात अनेकांच्या समस्या वाढल्या आहेत. पावसाळ्यात रात्रीच्या वेळी घरामध्ये किटकांची संख्या वाढते. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येकासाठी अवघड होऊन जाते. हे छोटे जीव रात्रीच्या वेळी उडून प्रकाशाच्या दिशेने म्हणजेच ट्युबलाईट, बल्बच्या आसपास फिरतात. कित्येकदा हे किटक कान किंवा नाकात शिरतात. जर रात्रीच्या वेळी घरामध्ये किटकांना घालवण्यासाठी उपाय शोधत आहात तर मग आम्ही येथे काही सोपे पर्याय सांगणार आहोत जे तुमच्यासाठी उपयूक्त ठरतील.
कोणते आहेत ते उपाय
१. रात्रीच्या वेळी दिवे बंद करा
किटकांपासून सुटका मिळवण्यासाठी रात्रीच्या वेळी लाईट बंद करून झोपा. कारण किटक प्रकाशाकडे पटकन आकर्षित होतात. जर तुम्हाला अंधारात झोपण्याची सवय नसेल तर खोलीतील प्रकाश थोडा कमी करा. असे केल्याने किटक कमी होतात. खिडकी आणि दरवाज्यामधून किटक घरामध्ये घुसतात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला खिडकी-दरवाजे बंद करून ठेवा. त्यानंतर किडे लवकर घरात प्रवेश करत नाही.
हेही वाचा – तुम्ही तीन दिवस झोपला नाहीत, तर तुमच्या शरीर आणि मनावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
२. होममेड कँडल होऊ शकते मदत
किटक आपल्यासह कित्येक आजारांना घेऊन येतात. त्यांच्या पहिला हल्ला घरातील अन्नावर करतात. त्याचबरोबर त्यांना अस्वच्छ जागा जरा जास्तच आवडतात. त्यामुळे घरातील साफ सफाईकडे लक्ष देतात. त्यामुळे या किटकांची संख्या कमी होते. या किटकांपासून सुटका मिळवण्यासाठी होममेड कँडल खूप जास्त उपयोगी ठरते. पण ते तयार करताना तुम्ही लव्हेंडर आणि पेपरमिंट वापरले तर उपाय आणखी प्रभावी ठरेल.
हेही वाचा – प्लास्टिकच्या बाटलीवर १ ,३, ६ किंवा ७ हे नंबर असेल तर लगेच टाकून द्या, अन्यथा…जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट
३. हे उपाय करून पाहा
यूकेलिप्टस, सिट्रोनेला इसेन्शिअल ऑईल आणि लेमन ज्यूसच्या दहा-दहा थेंब टाकून रुमफ्रेशनर तयार करु शकता. त्यामुळे हे सर्व मिश्रणात एक बॉटलमध्ये टाकून शिंपडा. असे केल्याने घरात किटक पळून जातील कारण त्यांना हा वास आवडत नाही.