स्वच्छ, सुंदर आणि सतेज चेहरा सगळयांनाच हवाय. सुबक चेहऱ्यावर एक काळा डाग स्वत:ला फारच हिणवतो. पुरूष असो वा स्त्री, चेहऱ्यावरचे डाग कोणीही सहन करू शकत नाही. गालावरच्या काळया डागांमुळं जे खड्डे पडतात ते दिसायला खूप वाईट दिसतात. ते आपल्या संपूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य बिघडवण्याचे काम करतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही लोक ब्युटी ट्रीटमेंटचा आधार घेतात. मात्र, यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. पण काळजी करू नका, आपला स्वस्त आणि मस्त घरगुती उपाय, काळया डागांना मुक्त करून चेहरा अधिक उजळ करेल. यासाठी फक्त फॉलो करा या सोप्या टीप्स.
मुरूमांचे प्रकार
मुरुमांचे सहा प्रकार आहेत. यामध्ये ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्स, पिंपल्स, गाठ, सिस्ट,अल्सर यासारख्या प्रमुख समस्या आहेत.
मुरूमांची लक्षणे कोणती ?
मुरूमांची किवा काळया डागांची लक्षणे त्वरीत दिसून येतात. त्याची वेळेवरच दक्षता घ्यायला हवी. मुरूम आपल्या त्वचेवर पू किंवा छोट्या-मोठ्या आकाराच्या पिंपल्सच्या रुपाने दिसून येतात. हे पिंपल्स आपला आकार वाढवत राहतात. मुरुम चेहऱ्याच्या त्या भागांमध्ये सर्वात जास्त येतात ज्या ठिकाणी तेलाच्या ग्रंथी जास्त सक्रीय असतात. चेहरा, मान, खांदा, छाती आणि पाठीचा वरच्या भागामध्ये मुरुम येत असतात.
आणखी वाचा : रात्री जेवणानंतर ‘या’ स्थितीत झोपा; पचनास आणि छातीत जळजळ कमी करण्यास होईल मदत
काळया डागांवर घरगुती उपाय
- अॅलोवेरा जेल औषधयुक्त
कोरफड व्हेरा जेलमध्ये अॅलोसिन असते, हा घटक जुन्या, हट्टी मुरुमांवर काम करण्यासाठी ओळखला जातो आणि हायपरपिग्मेंटेशन कमी करण्यास देखील मदत करतो. याशिवाय, कोरफड मधील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरुम आणि मुरुमांपासून दूर ठेवण्यास मदत करतात आणि मुरुमांच्या खुणा कमी दिसतात. काही ताजे कोरफड वेरा जेल काढा आणि रात्रभर मास्क म्हणून लावा. सर्वोत्तम परिणामांसाठी तुम्ही ही प्रक्रिया दररोज पुन्हा करू शकता.
- लिंबाचा रस गुणकारी
आयुर्वेदात लिंबाला अधिक महत्व आहे. लिंबू केवळ प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीच लोकप्रिय नाहीत, तर मुरुमांचे डाग काढून टाकण्यासाठी ते एक उत्कृष्ट औषध आहे. लिंबूमध्ये असलेले सायट्रिक ऍसिड चट्टे आणि खुणा कमी करतात. ताज्या लिंबाच्या रसाचे पाच ते सहा थेंब पाण्यात टाकून हे मिश्रण डाग असलेल्या ठीकाणी लावा. लावतांना कापसाच्या गोळयाचा वापर करा. जवळपास १५ मिनिटं हे मिश्रण चेहऱ्यावर लावून आराम करा. नंतर थंड पाण्यानं त्याला स्वच्छ धुवून काढा.
आणखी वाचा : व्हा सावधान ! रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांना ‘या’ गंभीर आजाराचा धोका
- बहुगुणी हळद
आयुर्वेदात हळदीला अधिक महत्व आहे. हळदीचे उत्कृष्ट गुणधर्म केवळ मुरुमांच्या खुणा कमी करण्यासच नव्हे तर त्वचेला एक सुंदर निरोगी चमक आणण्यास मदत करतात. एक चमचा हळद घेऊन त्यात गुलाबपाणी किंवा कच्च्या दुधात मिसळा. ही पेस्ट चट्टे किंवा चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटे राहू द्या. साध्या पाण्याने आणि त्यानंतर मॉइश्चरायझरने चेहरा स्वच्छ करा.
- चंदन पावडर पावरफूल
चंदन चेहऱ्यासाठी उत्तम क्लिन्जर म्हणून काम करते. मुरुमांना कारणीभूत असलेल्या चेहऱ्यावरील घाण आणि काजळी बाहेर काढण्यास मदत करते. शिवाय, ते काळे डाग कमी करते आणि टॅन देखील काढून टाकते. एक चमचा चंदन पावडर गुलाब पाण्यात मिसळा किंवा खोबरेल तेलाचे काही थेंब घाला. त्याचा पेस्ट १२ ते १५ मिनिटं ठेवल्यानंतर त्याला पाण्यानं स्वच्छ धूवून काढा.
वरिल पध्दतीनं काळया डागांवर किवा मुरमांवर आपण घरगुती उपाय केल्यास निश्चितच आपल्याला याचा फायदा होईल. डाग अधिक मोठया स्वरूपाचे असतील किवा गंभीर असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.