आपण सर्वांना चारोळी ही माहीतच आहे. मात्र ही ड्राय फ्रूट मधली चारोळी खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. आयुर्वेदात चारोळीचा वापर अधिक वर्षापासून केला जातो. चारोळी अनेक पोषण तत्त्वयुक्त असल्याने या बियांचा उपयोग डोकेदुखीपासून ते खोकला बद्धकोष्ठता आणि त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो. चारोळी ही पोटाशी संबंधित असलेले आजार देखील दूर करते. चला तर मग जाणून घेऊयात पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी चारोळीचा वापर कसा केला जातो.
बद्धकोष्ठता बरी करते
आयुर्वेदानुसार चारोळीच रोज सेवन केल तर बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते आणि पचनतंत्रात तयार झालेले विष बाहेर काढण्यास मदत करते. या व्यतिरिक्त चारोळी तुमच्या आतड्यांमधील आतील स्तर साफ करण्याचे काम करते. जर तुम्ही बद्धकोष्ठता या आजारामुळे त्रस्त झाला असाल तर चारोळीचं सेवन केल्याने तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी चारोळीचं सेवन करावं.
अतिसार समस्या दूर होते
तुम्हाला जर अतिसाराचा त्रास होत असेल आणि त्याबरोबर वारंवार रक्तस्त्राव होतोय. तर तुम्ही तुमच्या आहारात चारोळीचा समावेश करा. आयुर्वेदानुसार तुम्ही चारोळीची साल बारीक वाटून ती शेळीच्या दुधात मिक्स करून त्यात मध टाकून त्याचे सेवन केले तर अतिसारासह रक्तस्त्रावाची समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच तुम्ही जर चारोळीची पाने आणि मूळ हे बारीक करून त्याचे सेवन लोणीबरोबर केले तर तुम्हाला अतिसारपासून आराम मिळतो.
डायरिया (जुलाब)
तुम्हाला जर अधिक काळ जुलाबाचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात चारोळीच्या तेलाचा समावेश करावा. चारोळीच्या तेलाचा वापर तुम्ही खिचडी, डाळ अशा अनेक पदार्थांमध्ये करून सेवन करा. यानंतर तुम्ही चारोळीची पावडर तयार करून दुधात मिक्स करून नियमित घेतल्याने अतिसार आणि जुलाब या समस्या दूर होतील.
(टीप: वरील टिप्सचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)