प्रत्येकाला पुरेशी झोप मिळण्याची आवश्यकता असते. पण, कामाचा दबाव, व्यस्त जीवनामुळे अनेकदा हे अशक्य होते. मात्र, जर तुम्ही पुरेशी झोप घेत असाल तर तुम्हाला दुस-या प्रकारचा मधुमेह होण्याचा धोका काही प्रमाणात कमी होतो. इन्सुलिनचा शरिरातील प्रतिसाद कमी झाल्याने मधुमेहाचा आजार बळावतो. त्यामुळे, आठवडयातले निदान तीन रात्री चांगली झोप घेतल्याने शरिरातील इन्सुलिनची क्रियाशीलता वाढेल, असे लॉस एंजिलिस बायोमेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूडच्या संशोधकांना आढळले आहे.
झोपेचे तास वाढविल्याने शरिराची इन्सुलिनचा वापर करण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळे प्रौढ व्यक्तिंमध्ये दुस-या प्रकारचा मधुमेह होण्याचा धोका कमी होतो, असे संशोधक डॉ. पीटर लिउ यांनी सांगितले आहे. रक्तातील साखरेच्या पातळीचे नियमन करण्यासाठी इन्सुलिन हा रामबाण उपाय आहे. दुस-या प्रकारचा मधुमेह असणा-या रुग्णाचे शरिर इन्सुलिनचा योग्य वापर करु शकत नाही किंवा इन्सुलिनच्या प्रभावास प्रतिसाद नाही देत. दीर्घकाळ कार्यरत असणा-या प्रौढ व्यक्तींनी त्यांच्या झोपेचे तास वाढविले तर इन्सुलिनची क्रियाशीलता वाढेल आणि परिणामी, दुस-या प्रकारच्या मधुमेहाचे प्रमाण कमी होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा