Desi Ghee For Skin: हिवाळा सुरू झाला की, आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. हिवाळ्यात थंड हवेमुळे आपली त्वचा आर्द्रता गमावते. अशावेळी त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. आजकाल बाजारात अनेक हिवाळ्यातील विशेष मॉइश्चरायझर्स आणि क्रीम्स उपलब्ध आहेत. पण तुम्ही काही घरगुती पद्धतीचा वापर करून देखील हिवाळ्यात तुमची त्वचा चमकदार बनवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेहऱ्यासाठी गुणकारी गोष्ट म्हणजे तूप. जर तुम्हाला वाटत असेल की तूप फक्त तुमच्या आरोग्यासाठी चांगले आणि फायदेशीर आहे, तर तसे नाही, तुमच्या त्वचेच्या आणि केसांच्या सौंदर्यासाठीही तूप खूप फायदेशीर आहे. तुपामुळे त्वचेला भरपूर प्रमाणात लाभ मिळतात. यामध्ये समाविष्ट असलेल्या औषधी गुणधर्मांचा चेहऱ्यासाठी उपयोग होतो. त्वचेबरोबरच केसांसाठीही तुपाचा वापर केला जातो. तसेच बहुतांश लोकं आपल्या डाएटमध्ये देखील तुपाचा समावेश करतात. त्वचेसाठी तूप नेमकं कसं फायदेशीर ठरतं, हे आपण जाणून घेऊया.

तूप कोरड्या त्वचेसाठी अधिक उपयुक्त

तूप त्वचेसाठी अधिक गुणकारी आहे. तूप कोरड्या त्वचेवर अगदी चांगल्या पद्धतीने काम करतं. एखाद्या मॉयश्चरायजरप्रमाणे तूप चेहऱ्यावर कार्य करते. चेहऱ्याला तुपापासून तयार केलाल फेस पॅक तुम्ही लावला असेल तर तो पूर्ण सुकल्यानंतर गुलाबपाणी त्यावर स्प्रे करा. त्यानंतर हलक्या हाताने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे डेड स्किन सेल्स पूर्णपणे निघून जाईल. तसेच चेहऱ्याला पोषक तत्त्वांचा देखील पुरवठा होईल.

आणखी वाचा : Beetroot For Lips: ओठांसाठी अत्यंत उपयुक्त आहे बीटरूट; ओठ होतील हायड्रेट आणि नॅचरल पिंक

त्वचा होईल आकर्षक
निखळ त्वचेसाठी तुपाचे २ ते ३ थेंब घ्या. त्यानंतर ५ मिनिटे तुपाने चेहऱ्याला मसाज करा. पण तुपाने मसाज करण्यापूर्वी फेश वॉशने चेहरा स्वच्छ धूवा. तसेच मसाजपूर्वी स्किन टोनरचा देखील वापर करायला विसरू नका. चेहऱ्यावर लावलेले स्किन टोनर पूर्ण सुकल्यावरच तुपाने त्वचेवर मसाज करा. अशाप्रकारे तुम्ही नियमित तुपाचा वापर केला तर काही दिवसांमध्येच तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

लिप बाम म्हणून वापरणे
बहुतेक हर्बल आणि आयुर्वेदिक लिप बाम बेस म्हणून देसी तूप वापरतात. तुमचे ओठ नेहमी कोरडे आणि भेगा पडत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी त्यावर देशी तूप लावा, काही दिवसात ते गुलाबाच्या फुलांनी मऊ होतील. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घरच्या घरी यापासून तुमचा स्वतःचा लिप बाम देखील बनवू शकता. यासाठी एका भांड्यात २ चमचे तूप आणि १ चमचे खोबरेल तेल वितळवून घ्या. त्यात पेपरमिंट ऑइलचे काही थेंब घाला आणि नंतर ते स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या कुपीमध्ये ठेवा. त्याचप्रमाणे थोडे तुपात साखर मिसळूनही तुम्ही चांगला लिप स्क्रब तयार करू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghee is very beneficial to get rid of dry skin problem in winter pdb
Show comments