Ghee Or Coconut Oil: एखादी भाजी बनवायची असेल किंवा पोळी, पराठे तयार करायचे असतील, तर तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करता. थोडक्यात तेल, तूप हे स्वयंपाकघरातील महत्त्वाचे पदार्थ आहेत. पण आरोग्यासाठी यापैकी नेमकं कशाचं सेवन करणं फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर, आज हे जाणून घेऊ. विशेषतः गोडाच्या पदार्थांमध्ये तूप घातलं जातं आणि रोजचं जेवण तेलाचं असतं. तर, काही जण रोजच्या जेवणातही तूप वापरतात. या दोन्हीपैकी आरोग्यासाठी नेमकं काय फायदेशीर आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर मग जाणून घेऊ त्याबाबत….

तुपाचे फायदे काय आहेत?

Amit Shah on Ambedkar
अमित शाह यांनी आंबेडकरांवर केलेली टिप्पणी वादात? काँग्रेसकडून टीका, माफी मागण्याची मागणी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
do not put these foods in fridge
फळे, भाज्या अनेक दिवस फ्रिजमध्ये साठवून ठेवता? आजच व्हा सावध… नाहीतर उद्भवतील अनेक समस्या
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Amit Shah announces Uniform Civil Code in BJP ruled states
भाजपशासित राज्यांत समान नागरी कायदा; राज्यसभेत संविधानावरील चर्चेत अमित शहा यांची घोषणा
Divorce
Farmer Divorce : ७० वर्षीय शेतकऱ्याने घेतला घटस्फोट, ४४ वर्षांचा संसार मोडल्यानंतर पोटगीसाठी द्यावे लागले ‘इतके’ कोटी रुपये!
Pakistani Beggars in Saudi Arabia Freepik
हाय प्रोफाईल भिकारी ठरले पाकिस्तानची डोकेदुखी, मुस्लीम राष्ट्राच्या तडाख्यानंतर विमानप्रवासावर घातली बंदी

आयुर्वेदानुसार आपले आजी-आजोबा नेहमी तुपातील जेवणाचा सल्ला देतात. तूप हे आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच; पण त्याचबरोबर ते अनेक आजारांचा धोका कमी करण्यासही मदत करते. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि निरोगी कोलेस्ट्रॉलच्या पातळीला समर्थन देण्यासाठी ओळखले जाते. त्याशिवाय तूप अँटिऑक्सिडंट्स आणि ए, ई व के या जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे असून, ते सर्व त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

नारळ तेलाचे फायदे काय आहेत?

खोबरेल तेल हे वजन कमी करण्यास अनुकूल तेलांपैकी एक मानले जाते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH)मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, नारळाच्या तेलाने लठ्ठ व्यक्तींमधील चयापचय सुधारण्यास मदत केली. त्याशिवाय नारळाच्या तेलामधील जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म त्वचेला आतून पोषण करण्यास मदत करतात आणि तिला निरोगी चमक देतात. खोबरेल तेलातील काही पोषक घटक केसांच्या वाढीलाही प्रोत्साहन देतात.

तेल व तूप यामध्ये स्वयंपाकासाठी काय आरोग्यदायी

फिटनेस प्रशिक्षक रॅल्स्टन डिसोझा यांच्या मते, तुपाच्या तुलनेत नारळ तेल हे स्वयंपाकासाठी उत्तम पर्याय आहे. ते स्पष्ट करतात की, तुपामध्ये कोलेस्ट्रॉल असते, जे मोठ्या आचेवर गरम केल्यावर ऑक्सिस्टेरॉल बनवते. बहुतेक पारंपरिक भारतीय स्वयंपाक उच्च आचेवर केला जात असल्याने स्वयंपाकासाठी तूप वापरणे ही चांगली कल्पना नाही. डिसूझा पुढे सांगतात की, तुपातील कोलेस्ट्रॉलमुळे तुम्हाला हृदयविकाराचा धोका जास्त संभवतो. त्याचबरोबर कोणत्याही तेल किंवा तुपाचा मांसाहारी पदार्थांमध्ये जपून वापर करावा. जर या पदार्थांमध्ये जास्त तेल, तूप घातल्यास कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. अति तेलकट, अति तिखट पदार्थ आरोग्यासाठी खूपच धोकादायक असतात.

तेलात फॅटी अॅसिड्स असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्या तुलनेत तुपात फॅटी अॅसिडचं प्रमाण कमी असतं. याउलट तुपात फॅट्स असतात, जे हृदयासाठी धोकादायक ठरतात. तरीही तेल किंवा तूप असो; त्याचा योग्य आणि प्रमाणात वापर झाला, तरच ते आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. त्यामुळे या दोन्ही पदार्थांचा शक्य होईल तेवढा कमी वापर करावा, असं डॉक्टरांनी सांगितलं. तुमच्या तूप आणि खोबरेल तेलाच्या वापराबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी हे मुद्दे लक्षात ठेवा; जेणेकरून तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकाल.

हेही वाचा >> हिवाळा ठरू शकतो आरोग्यासाठी त्रासदायक! ‘अशा’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी

टीप : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Story img Loader