Ginger benefits in winter: हिवाळ्यात फक्त सर्दी-खोकलाच नाही तर इतरही अनेक आजार आपल्याला पटकन ग्रासतात. अशा परिस्थितीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या शरीराला थंडीपासून बचाव करून निरोगी ठेवतात. यापैकी एक गोष्ट म्हणजे आले. सोडियम, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, सी, फोलेट, झिंक आणि मॅग्नेशियम यांसारखे गुणधर्म असलेले आले हिवाळ्यात अनेक आजारांपासून बचाव करू शकतात. जाणून घ्या अद्रकाचे कोणते फायदे आहेत.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
Cardamom benefit in winter Wonderful Cardamom Benefits You Should Definitely Know About
हिवाळ्यात वेलची खाण्याचे आश्चर्यकारक फायदे; आहारात समावेश करण्याआधी नक्की वाचा
Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
Sweet or savoury breakfast
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…

हिवाळ्यात आल्याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामुळे शरीर रोगांशी लढण्यास सक्षम होते आणि निरोगी राहते. अशा परिस्थितीत या हंगामात आल्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

सर्दी आणि खोकल्यापासून आराम

आले हे आयुर्वेदात खूप फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात आल्याचे सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. यासाठी आल्याचा चहा पिणे फायदेशीर मानले जाते. यामुळे सर्दी होत नाही आणि शरीर संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करू शकते.

लिव्हरच्या समस्येपासून सुटका मिळेल

हिवाळ्यात गरम चहामध्ये आल्याचा तुकडा टाकून तो पिणे फायदेशीर मानले जाते. जेवणानंतर एक तासाने याचे सेवन करणे अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. असे केल्याने लिव्हरची समस्याही दूर होऊ शकते.

किती प्रमाणात आलं खावं

दररोज आलं ४ ते ५ ग्रॅम याच प्रमाणात खायला हवे. आल्याचा रस किंवा आल्याचा आहारात समावेश केल्यास लठ्ठपणा कमी होण्यासही मदत होते.

हेही वाचा >> Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय

बद्धकोष्ठतेपासून सुटका

थंडीच्या महिन्यात आहारात बदल होतो, त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता अशा समस्यांनी लोक हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आल्याचे सेवन केल्यास या समस्यांपासून सुटका मिळू शकते.