यूरिक अ‍ॅसिड हे एक प्रकारे केमिकलच आहे, जे आपल्या शरीरात प्यूरिन नावाच्या पदार्थांपासून बनतो. प्यूरिन हे एक प्रकारचे रसायन आहे, जे शरीरात तयार होतं. जर तुम्ही आहारात जास्त प्रमाणात प्युरिनयुक्त पदार्थ खात असाल तर तुमच्या रक्तात युरिक अ‍ॅसिड तयार होण्यास अजिबात वेळ लागणार नाही. जेव्हा युरिक अ‍ॅसिड वाढतं तेव्हा या स्थितीला हायपरयूरिसीमिया म्हणतात. यामुळे संधिवाताचा त्रास सुरू होऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याव्यतिरिक्त शरीरात यूरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढलं की हाडांमध्ये वेदना, सूज, जॉईंट्स किंवा गाठी, संधिवात होऊ शकतं. यात टाइप -2 मधुमेह आणि हृदय रोगाचा धोका देखील असू शकतो. याशिवाय काही खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीशी संबंधित विकारांमुळे यूरिक अ‍ॅसिड शरीरात देखील साचू शकतो, याची काही उदाहरणे अशी आहेत. त्यामुळे आपल्या जीवनशैली आणि खाण्या पिण्याच्या सवयींमध्ये काही बदल केल्यास शरीरात वाढत असलेल्या यूरिक अ‍ॅसिडला कंट्रोल करू शकतो.

आलं: आल्यामध्ये इन-इंफ्लामेट्री आणि एंटी-ऑक्सीडेंट्स प्रॉपर्टीज असतात. यामुळे यूरिक अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. त्याचबरोबर आल्यामधील गुणांमुळे सुज आणि वेदना कमी करण्यास उपयुक्त असतात. आल्यामुळे हाइपरयूरिसीमियाच्या पातळीला नियंत्रणात आणण्यास मदत होते. तुम्ही वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने आल्याचं सेवन करू शकता. तुम्हाला हवं असल्यास चहामध्ये आलं घालून ते पिल्यास गुणाकारी ठरतं.

आल्याचं पाणी: दोन कप पाणीमध्ये आलं कापून त्याचे तुकडे करून घ्या. काही वेळासाठी आल्याचे तुकडे पाण्यात भिजवत ठेवा. काही वेळाने हे पाणी प्या. सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी आल्याचं पाणी पिण्याने संपूर्ण दिवस उत्साही, ताजेतवाने राहण्यास मदत होते. आल्याचं पाणी पिण्याने रोगप्रतिकार शक्तीही चांगली होती. पित्त झाल्यासही आल्याचं पाणी पिण्याने आराम मिळतो. रात्रभर पाण्यात भिजत ठेऊन सकाळी उठल्यावर ते पाणी पिल्याने पचनक्रिया देखील उत्तम राहते. नियमीतपणे आल्याचं पाणी पिल्याने शरीरात वाढलेलं युरिक अ‍ॅसिड कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत होते.

त्वचेवरील जळजळ कमी होते: त्वचेवर होणारी जळजळ कमी करण्यासाठी एक चमचा ठेचलेलं आलं पाण्यात भिजवत ठेवा. काही वेळानंतर या पाण्यात एक स्वच्छ कपडा भिजवा. काही वेळासाठी हे पाणी थंड करण्यासाठी ठेवा. या कपड्याने जळजवळ होत असलेल्या त्वचेवर आल्याचं पाणी लावा. १५- २० मिनिटं हा उपाय केल्यानंतर तुमच्या त्वचेची जळजळ कमी होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ginger is helpful to control high uric acid problem know how to consume prp