तूप हा भारतीय खाद्यपदार्थामधील सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे. गरमा गरम पुरणाची पोळी असो की उकडीचे मोदक, डाळ भात असो की प्रसादाचा शिरा…तूपाशिवाय हे पदार्थ खाण्याचा आनंद मिळत नाही. तूप या पदार्थांची चव वाढवते. तूप खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहे. आयुर्वेदामध्ये तूपाचे महत्त्व आहे. आयुर्वेदात औषध म्हणूनही त्याचा वापर केला जातो. तसेच अनेक धार्मिक विधींमध्ये देखील तूपाचा वापर केला जातो.

गायीच्या किंवा म्हशीच्या दुधाचे दही लावून आणि दह्यापासून लोणी काढून ते कढवून घरगुती साजूक तूप तयार केले जाते. तूप हे दुधापासून तयार होत असल्याने दुधातील स्निग्ध पदार्थस्नात विरघळणारी सगळी जीवनसत्त्वे तुपातसुद्धा असतात. तुपात ‘अ’, ‘ई’, ‘क’, ‘ड’ ही जीवनसत्त्वे असतात आणि ओमेगा-६ व ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स यासारखी अनेक पोषक तत्त्वे असतात.

little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sea Viral Video
‘आयुष्य आणि स्पर्धा..!’ भल्यामोठ्या लाटा, बोटीचा वेग, वादळ वारा; समुद्रातील ‘तो’ Video पाहून अंगावर येईल शहारा
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
makar sankranti birds emotional video
“पतंग नवीन खरेदी कराल; पण त्यांच्या जीवाचं काय?” मकर संक्रांतीचा ‘हा’ आनंद कोणाला तरी कायमचं दुख देऊन जातोय; पाहा हृदयद्रावक video
Is Selling Fruits On The Footpath In Pune Watermelon seller's video
पुणे तिथे काय उणे! कलिंगड विकण्यासाठी विक्रेत्याची भन्नाट आयडिया; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Makar Sankranti 2025 Funny video of a kid flying a kite with pants falls down viral video
याला म्हणतात नाद! पँट खाली आली पण पतंग नाही सोडली; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

पारंपारिक पद्धतीने तूप आपण नेहमी बनवतो. पण आता सध्या सोशल मीडियावर तूप बनवण्याची नवी पद्धत व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये चक्क कुकरमध्ये तूप कसे बनवायचे सांगितले आहे. इंस्टाग्रामवर bhagyashree.bhandari.1वर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हेही वाचा – घरच्या घरी कसे लावावे मिरचीचे रोप? जाणून घ्या सोपी ट्रिक, पाहा Viral Video

कुकरमध्ये तूप कसे बनवावे?

  • कुकर गॅसवर गरम करायला ठेवा.
  • त्यात तांब्याभर पाणी टाका.
  • नंतर त्यात तयार लोणी टाका.
  • कुकरचे झाकण लावून दोन शिट्टी येऊ द्या. गॅस बंद करा आणि शिट्टीतून वाफ जाऊ द्या.
  • त्यानंतर झाकण काढा आणि पुन्हा गॅसवर तूप उकळवायला ठेवा.
  • तुपात चार-पाच लवंग टाका म्हणजे तूप करताना वास येणार नाही.
  • १५ मिनिटे उकळी येऊ द्या. त्यानंतर तूप तयार होईल.
  • तयार तूप गाळून घ्या आणि एका बरणीमध्ये साठवून ठेवा.

हेही वाचा – कढीपत्त्याचं रोपटं वाढतच नाहीये? खत म्हणून वापरा ‘हा’ घरगुती पदार्थ; झटपट होईल वाढ अन् कीडही लागणार नाही

तुम्ही स्वत: तूप बनवण्याची नवी पद्धत वापरून पाहू शकता.

Story img Loader