आपल्या अजूबाजूला दारू पिण्याचे दुष्परिणाम दिसत असताना जर, एख्याद्याला दारू पिणे चांगले आहे असे सांगितल्यास काय प्रतिक्रीया येतील याची कल्पना आहे. मात्र, बेताचे अल्कोहोल सेवन केल्यास ते मानवी आरोग्यासाठी लाभदायी असल्याचे नव्याने करण्यात आलेल्या एका अभ्यासातून सिध्द झाले आहे. विशेष म्हणजे या बेताच्या अल्कोहोलमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून संसर्ग होण्याचे टळत असल्याचा दावा या अभ्यासावर संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांनी केला आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या प्रतिक्षमताशास्त्राच्या अभ्यासकांनी असे म्हटले आहे की, या संशोधनामुळे संसर्ग टाळण्यासाठी औषध निर्मितीमध्ये मोठा उपयोग होणार आहे.
शास्त्रज्ञांनी या संशोधनासाठी १२ वानरांवर प्रयोग केले. त्यामध्ये वानरांना वाईन पिण्यासाठी देण्यात आली. सर्वप्रथम या प्राण्यांना देवीची लस टोचण्यात आली होती. त्यानंतर सलग १४ महिने या प्राण्यांना इथनॉल पिण्यासाठी देण्यात आले होते. जे प्राणी बेताने इथनॉल पिले त्यांचे आरोग्य सुधारल्याचे समोर आले. मात्र, ज्या प्राण्यांनी अतिरेक केला त्याचे दुष्परिणाम देखील दिसून आल्याचे या संशोधन गटाचे प्रमुख इल्हेम मसूदी यांनी सांगितले.
रोज एक ग्लास वाईन आरोग्यास लाभदायी
आपल्या अजूबाजूला दारू पिण्याचे दुष्परिणाम दिसत असताना जर, एख्याद्याला दारू पिणे चांगले आहे असे सांगितल्यास काय प्रतिक्रीया
First published on: 18-12-2013 at 04:50 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Glass of wine a day may keep the doctor away