Make This Healthy Juice Easily At Home : डाळिंब हे फळ अँटिऑक्सिडंट्सच्या बाबतीत स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी व रास्पबेरीशीसुद्धा स्पर्धा करू शकते. व्हिटॅमिन ए, लोह याव्यतिरिक्त डाळिंबात इतर अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. मार्केटमध्ये डाळिंब वर्षभर उपलब्ध असले तरी हिवाळ्यात ते स्वस्त दरात मिळते. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल, तर तुम्ही दररोज एक डाळिंब म्हणजेच डाळिंबाच्या बिया किंवा रस पिणे आवश्यक आहे. कारण- तुमच्या शरीर आणि चेहऱ्यासाठी ते फायदेशीर आहे (Glowing Skin Tip) . आता घरच्या घरी डाळिंबाचा रस कसा बनवायचा ते जाणून घेऊ.

कधी कधी आपण मार्केटमधून दोन ते तीन किलो डाळिंब आणतो; पण ते सोलण्यात खूप अडचण येते. याचबरोबर डाळिंब खाण्यातही अनेकांना त्रास होतो. वृद्ध दातांच्या समस्येमुळे डाळिंब खाऊ शकत नाही आणि मुलांना ते चघळणे अजिबात आवडत नाही. घरातील काही सदस्य लवकर कामावर जात असल्याने त्यांनाही डाळिंब सोलून खाण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. तर यावर उपाय म्हणजे डाळिंबाचा रस. डाळिंबाचा रस या सर्व समस्यांवर मात करू शकतो (Glowing Skin Tip). बाजारात भेसळयुक्त, घाणेरडा किंवा संसर्गजन्य ज्यूस विकत घेण्यापेक्षा डाळिंबाचा ज्यूस घरी बनवणे खूप चांगले आणि सोपेसुद्धा आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त मिक्सर आणि पांढरे कापड हवे आहे.

सोनु सुदने चपाती खाणे केले बंद! चपाती खाणे पूर्णपणे बंद केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Madhuri dixit shared glowing skincare hack for dull dry skin in winters know expert advice
बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने सांगितलं त्वचेचं रहस्य! ‘या’ रेसिपीने चेहरा दिसेल चमकदार, कोरड्या त्वचेची समस्या दूर
strawberry navi Mumbai marathi news
नवी मुंबई : एपीएमसीत लालचुटूक स्ट्रॉबेरींचा बहर, दरातही घसरण
blossoms of Cosmos flowers in Autumn season
निसर्गलिपी – शरद ऋतूतील बहर…
Why do we feel so thirsty after eating a gluten rich meal ग्लूटेनयुक्त जेवण खाल्ल्यानंतर आपल्याला इतकी तहान का लागते? तज्ज्ञांनी केला खुलासा
छोले कुल्चे, लसुण नान, पनीर सारखे पदार्थ खाल्यानंतर आपल्याला इतकी तहान का लागते?
Tea that will solve problem of pimples hairfall dark spots skin tea but know this expert advice
चहा ठरेल पिंपल्स, केसगळती आणि काळे डाग घालवण्यासाठी सर्वोत्तम उपाय! कॉन्टेन्ट क्रिएटरच्या ‘या’ रेसिपीवर तज्ज्ञ म्हणाले…
Seema Sajdeh Shared Her DIY nighttime skincare ritual
Seema Sajdeh : सीमा सजदेहने सांगितली स्किनकेअरमधली खास गोष्ट; त्वचेला चमकदार बनवणारा हा ट्रेंड तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल का? तज्ज्ञ म्हणतात…

हेही वाचा…Teeth Whitening Tips : तुमच्या टूथपेस्टला म्हणा गुड बाय! दात नैसर्गिकरीत्या पांढरेशुभ्र करण्यासाठी आजच करा यांपैकी आयुर्वेदिक उपाय

घरच्या घरी डाळिंबाचा रस कसा बनवायचा ते चला जाणून घेऊ…

  • डाळिंबाचा रस तयार करण्यासाठी प्रथम डाळिंब सोलून घ्या. ते मिक्सरमध्ये टाका आणि मिक्सर सेटिंगनुसार सर्वांत जास्त वेगाने मधे-मधे ब्रेक घेत पाच मिनिटे चालवा.
  • त्यानंतर डाळिंबाची प्युरी तयार होईल. त्यात अर्धी किंवा एक वाटी (डाळिंबाच्या प्रमाणानुसार) पाणी घाला. जर मोठे डाळिंब असेल, तर अर्धा कप पाणी पुरेसे आहे. दोन डाळिंबांसाठी एक कप पाणी पुरेसे आहे.
  • नंतर मिक्सर सुमारे एक मिनीट चालवा आणि एका वाडग्यावर किंवा रुंद तोंडाच्या भांड्यावर कापड ठेवा, त्यात बारीक करून घेतलेले मिश्रण टाका आणि ते चांगले दाबून गाळून घ्या.
  • कोणतीही भेसळ नसलेला ताजा आणि आरोग्यदायी डाळिंबाचा रस तुमच्यासाठी तयार आहे.
  • अशा प्रकारे ज्युसरशिवाय केवळ पाच मिनिटांत हेल्दी ज्यूस तयार होतो. जर तुम्हाला हवे असेल, तर तुम्ही त्यात गाजर आणि बीटरूटदेखील मिक्स करू शकता.

डाळिंबाचा रस या आजारांपासून करतो बचाव

डाळिंब हा १०० आजारांवर एक उपाय आहे, असे म्हटले जाते. या फळाचे इतके फायदे आहेत की, ते प्रत्येक आजारावर औषध म्हणूनदेखील खाल्ले जाते. त्यात कर्करोगविरोधी आणि दाहकविरोधी गुणधर्म आहेत. ज्यांना हिमोग्लोबिन किंवा लोहाची कमतरता आहे, त्यांच्यासाठी डाळिंब हा उत्तम उपाय आहे. हे आतड्याचे आरोग्य, अपचन आणि बद्धकोष्ठतादेखील सुधारते. डाळिंबाचा रस नियमित प्यायल्याने शरीर निरोगी तर होतेच; शिवाय चेहऱ्यावरील चमकही वाढवते (Glowing Skin Tip). आता उशीर न करता घरीच डाळिंबाचा रस बनवा आणि रोज प्या.

Story img Loader