तुम्ही निरिक्षण केलं असेल तर हिवाळ्यास सुरूवात झाली की बहुतांश लोकांची त्वचा ही मुळातच कोरडी आणि रुक्ष होते. त्वचा रुक्ष असल्यामुळे अशा लोकांना सतत अंगाला खाज सुटण्याची समस्या निर्माण होते. यासोबतच दुषित पाणी आणि औषधांचं सेवन केल्यानेही त्वचेवर खाज येऊ शकते. याव्यतिरिक्त शारीरिक स्वच्छता न राखणं हे देखील खाजेचं मोठं कारण बनू शकतं. या समस्येपासून कायमची मुक्ती मिळवून देण्यासाठी ग्लिसरीन हा रामबाण उपाय आहे. याचा कसा वापर करायचा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

थंडीच्या दिवसा त्वचेला सुरक्षित ठेवण्यासाठी ग्लिसरीन मदत करतंच. पण या व्यतिरिक्त इतरही वेगवेगळे उपयोग आहेत. अनेक फेशिअल क्रीम आणि क्रीनजरसाठी देखील ग्लिसरीनचा उपयोग होतो. ग्लिसरीन खूप चिकट असल्यामुळे त्वचेवरील घाण, प्रदूषण आणि इतर अशुद्धी दूर करण्यासाठी वापर होतो. ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ राहील. हे तुमच्या त्वचेवरील छिद्र बंद करण्यातही मदत करतं. पण ग्लिसरीन वापरण्याची योग्य पद्धत माहिती असणं गरजेचं आहे.

मेकअप रिमूव्हल: ग्लिसरीन हे मेकअप रिमूव्हलसारखं काम करतं. चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी तुम्ही वापरत असलेल्या मेकअप रिमूव्हलच्या जागी ग्लिसरीन वापरणं योग्य आहे. एका कापसाच्या बोळ्यावर ग्लिसरीन घेऊन चेहऱ्यावर लावा. पण डोळे आणि तोंडापासून ग्लिसरीन दूर ठेवा.

टोनर : जर तुम्हाला डागविरहीत त्वचा हवी असल्यास तुम्ही ग्लिसरीनला नैसर्गिक टोनरच्या रूपातही वापरू शकता. खरंतर, ग्लिसरीन हे त्वचेच्या पीएच स्तराला संतुलित करण्यात मदत करतं. यामुळे तुमच्या त्वचेला पोषणासोबतच डागविरहीत राहण्यासही हे फायदेशीर ठरतं.

असा करा वापर – चेहरा चांगला स्वच्छ करून घ्या आणि मग त्यावर ग्लिसरीन आणि गुलाबपाणी यांचं मिश्रण करून चेहऱ्यावर लावा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर दिवसातून 2 वेळा ग्लिसरीनला तुम्ही टोनरच्या रूपात वापरू शकता.

मॉईश्चरायजर : जर तुम्हाला तुमची त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करावी असं वाटत असेल तर रोज ग्लिसरीनचा वापर करा. हो, ग्लिसरीनपेक्षा उत्तम मॉईश्चरायजर असू शकत नाही. हे त्वचेवरील कोरडेपणा आणि डाग कमी करतं व त्वचेला डागविरहीत आणि चमकदार बनवतं. जेव्हा तुम्ही ग्लिसरीनचा वापर गुलाबपाण्यासोबत करता तेव्हा याचा दुहेरी फायदा होतो. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा मुलायम राहते.

असा करा वापर – जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमची त्वचा शुष्क आणि निर्जीव दिसत आहेत तेव्हा तुम्ही कापसाच्या बोळ्यावर ग्लिसरीन घेऊन चेहऱ्यावर लावा. काही सेंकदातच तुमची त्वचा ग्लो करू लागेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Glycerin lagane ka tarika use glycerin in these 3 ways in winter there will be no itching and irritation prp