नवरात्र, दसरा आणि आता येऊ घातलेली दिवाळी अशा सणासुदीच्या मोसमात ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी अनेक सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये प्रचंड प्रमाणात चढाओढ सुरू आहे. सोन्याच्या खरेदीवर लकी ड्रॉद्वारे मोटारगाडी, स्कूटर, ओव्हन, डीव्हीडी प्लेअर, टोस्टर आणि बंपर प्राईज म्हणून फ्लॅट देण्याची जाहिरातबाजी करण्यात येत आहे. काही ज्वेलर्सनी सिनेतारकांना आपले ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून करारबद्ध केले आहे. अलीकडेच ठाण्यातील एका ज्वेलरच्या दुकानाचे त्यांची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर अभिनेत्री विद्या बालनच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
ग्राहकांमध्ये होत असलेला मोबाईल, इंटरनेट आणि सोशल साईट्सचा वापर लक्षात घेऊन पुण्यातील प्रसिद्ध ‘पीएनजी ज्वेलर्स’नी PNGJewelers या आपल्या फेसबुक पेजवर ब्रॅण्ड अॅम्बेसिडर अभिनेत्री माधुरी दीक्षितची आकर्षक छबी असलेल्या जाहिराती पोस्ट केल्या आहेत. माधुरीचे हे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असून, अनेक लाईक्स मिळवत आहेत. माधुरी दीक्षितला घेऊन ‘क्षण आला भाग्याचा’ हे सोन्याच्या दागिन्याचे कॅम्पेन ते सध्या राबवत आहेत. सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या माधुरी दीक्षितचे मराठमोळ्या रुपातील सुंदर फोटो फेसबुकवर अपलोड करण्यात आले आहेत. माधुरीच्या स्मित हास्याचे अनेकजण दिवाने आहेत. याचा वापर करून एक आकर्षक फेसबुक कव्हरपेज येथे वापरण्यात आले आहे. याशिवाय एका व्हिडिओमध्ये नखशिखांत सोन्यानी मढलेली ही लावण्यवती पीएनजींच्या ‘क्षण आला भाग्याचा’ विषयी माहिती देताना दिसते. ग्राहकाला भुरळ पाडण्यासाठी दुकानदार एव्हढा सगळा खटाटोप करत असले, तरी वाढती महागई पाहता ग्राहकराजाला सोने खरेदी करणे जरा अवघडच जाईल, असे जाणवते.
सोन्याची आणि लकी ड्रॉची भुरळ!
नवरात्र, दसरा आणि आता येऊ घातलेली दिवाळी अशा सणासुदीच्या मोसमात ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी अनेक सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये प्रचंड प्रमाणात चढाओढ सुरू आहे.
First published on: 16-10-2013 at 03:29 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold advertisement