हृदय रोगांपासून वाचवणाऱ्या चांगल्या कोलेस्टेरॉलचे शरीरामध्ये जास्त प्रमाण झाल्यास स्तनाचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असल्याचे एका नव्या संशोधनामधून समोर आले आहे.
शास्त्रज्ञांना स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींमध्ये लिपोप्रोटीन(एचडीएल) आढळले. लिपोप्रोटीनमुळेच(एचडीएल) कर्करोगाचा प्रभाव वाढत असल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनामध्ये आले. या शोधामुळे कर्करोगावर उपचार करणे सोपे होणार असल्याचा दावा या संशोधनावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी केला आहे.         
“स्तनाच्या कर्करोगामध्ये आपन जर लिपोप्रोटीन(एचडीएल)च्या कार्यक्षमतेला आळा घातल्यास त्यापासून होणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून कर्करोग्यांना दिलासा मिळू शकतो. ‘एचडीएल’वर नियंत्रण मिळवल्यामुळे रक्तवाहिन्यांना देखील फायदा होतो,” असे थॉमस जेफरसन विद्यापीठाच्या जीवरसायन शास्त्र विभागाचे कर्करोग जीवशास्त्रज्ञ फिलिपी फँक म्हणाले.        
सूक्ष्म पातळीवर स्तनांच्या कर्करोगाच्या पेशींवर संशोधन करताना फँक आणि त्यांच्या संशोधक सहकाऱ्यांना ‘एचडीएल’मुळे कर्करोगाची तिव्रता वाढत असल्याचे आढळले. ‘एचडीएल’च्या वाढत्या प्रमाणामुळे कर्करोगाच्या पेशी आक्रमक होवून शरीरातील कर्कप्रक्षेपी भागामध्ये स्थलांतर करत असल्याचा दावा या संशोधन गटाने केला आहे.
यावर उपचार करण्याकरीता औषध निर्मितीसाठी अधीक संशोधन होणे गरजेचे असल्याचे या संशोधक गटाने म्हटले आहे.           

Story img Loader