Budh Rashi Privartan 2021 Good For 5 Zodiac Sign : बुध ग्रहाने २९ डिसेंबर २०२१ रोजी आपली राशी बदलून शनिमध्ये प्रवेश केला आहे. बुध ग्रहाचे हे संक्रमण ज्योतिष शास्त्रात खूप खास मानले जाते. कारण बुध सामान्यतः २१ दिवस राशीमध्ये राहतो, परंतु यावेळी बुध ६८ दिवस या राशीत राहील. म्हणजेच ५ मार्च २०२२ पर्यंत बुध मकर राशीत शनीसोबत बसेल. मकर राशीतील बुधाचे राशीपरिवर्तन ५ राशीच्या लोकांसाठी खूप सकारात्मक दिसत आहे.
मेष: तुमच्या तिसऱ्या आणि सहाव्या घराचा स्वामी बुध ग्रह दहाव्या भावात प्रवेश करेल. यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. जे प्रशासकीय पदांवर कार्यरत आहेत, त्यांची प्रतिष्ठा वाढेल. व्यवसाय क्षेत्राशी निगडीत लोकांसाठीही हे संक्रमण उत्तम ठरेल. या काळात नवीन प्रकल्पांवर काम कराल. लेखकांसाठी हा काळ उत्तम आहे. एकूणच मेष राशीच्या लोकांना या काळात चांगली कमाई करता येईल.
मिथुन: बुधाचे राशीपरिवर्तन तुमच्यासाठी खूप चांगले राहील. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील. तुम्ही चांगले पैसे कमवू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमचे खूप कौतुक होईल.
आणखी वाचा : Mars Transit: मंगळ ग्रह धनु राशीमध्ये करणार प्रवेश, २०२२ मध्ये या ४ राशींच्या व्यक्तींना होईल धनलाभ
सिंह: बुधाचा संक्रमण काळ तुमच्यासाठी खूप सकारात्मक दिसत आहे. या काळात तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. नोकरदार आणि व्यावसायिक दोघांसाठी हा काळ चांगला राहील. तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. करिअरमध्ये लाभ मिळण्याच्या अनेक संधी मिळतील.
आणखी वाचा : Health Tips : विवाहीत पुरुषांनी हे ५ पदार्थ खावेत, तुम्हाला मिळतील आश्चर्यकारक फायदे
धनु: मकर राशीत बुधाचे संक्रमण तुमच्यासाठी खूप शुभ दिसत आहे. तुमचे संवाद कौशल्य वाढेल. या काळात अनेक नवीन नाती तयार होतील. व्यवसाय आणि नोकरी या दोन्हींशी संबंधित लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. तुमच्या पूर्वीच्या प्रयत्नातून तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. या राशीचे लोक जे अकाउंटन्सी, इन्व्हेस्टमेंट बँकिंग किंवा फायनान्सशी संबंधित क्षेत्रात काम करत आहेत त्यांना या काळात खूप चांगले यश मिळेल. तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर दीर्घकालीन योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.
मीन: या संक्रमण काळात करिअरला बळ मिळेल. चांगली कमाई करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही उत्पन्नाच्या अतिरिक्त स्रोतांमधून पैसे कमवू शकाल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल. एकूणच हा संक्रमण काळ तुमच्यासाठी शुभ मानला जाऊ शकतो.