रिलायन्स जिओ हे ग्राहकांसाठी आता एक चांगली बातमी देत आहे. रिलायन्स रिटेल ग्राहकांना रिलायन्स जिओच्या तीन प्रीपेड प्लॅनवर २० टक्के कॅशबॅक देत येत आहे. कंपनीने तीन रिचार्ज प्लॅनवर कॅशबॅक ऑफर सुरू केली आहे. यामध्ये २४९, ५५५ आणि ५९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर तुम्ही कॅशबॅक घेऊ शकतील. मात्र हा कॅशबॅक तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा तुम्ही MyJio अॅप किंवा Jio च्या अधिकृत वेबसाइटवरून रिचार्ज कराल. टेलिकॉम ऑपरेटर वापरकर्त्यांच्या जिओ खात्यात कॅशबॅक जमा करेल, जे भविष्यातील रिचार्जसाठी वापरले जाऊ शकतात.
जिओची ही कॅशबॅकची ऑफर फक्त तीन प्लॅनवर लागू होईल ज्याची किंमत २४९ रुपये, ५५५ रुपये आणि ५९९ रुपये आहे. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे आणि या प्लॅनमध्ये दररोज २ जिबी (2GB) हाय स्पीड डेटा देण्यात आला आहे.
२४९ रुपयांचा प्लॅन
जिओच्या २४९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये रिलायन्स जिओकडून तुम्ही रीचार्ज केल्यास तुम्हाला कॅशबॅक मिळू शकतो. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांविषयी बोलायचे झाल्यास तुम्हाला दररोज २ जिबी (2GB) डेटासह २८ दिवसांची वैधता आहे. यात तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सुविधा आणि दररोज १०० एसएमएस पाठवू शकतात.
५५५ रुपयांचा प्लॅन
५५५ रुपयांच्या या जिओ प्रीपेड प्लानमध्ये वापरकर्त्यांना २०% कॅशबॅक देखील दिले जात आहे. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज १.५ जिबी डेटा देण्यात आला आहे. ज्याची वैधता ८४ दिवस आहे. यासह यामध्ये तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज एसएमएस करू शकतात.
५९९ रुपयांचा प्लॅन
५९९ रुपयांच्या या प्रीपेड प्लानमध्ये २० टक्के कॅशबॅक देण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये देखील तुम्हाला दररोज २ जिबी (2GB) डेटासह ८४ दिवसांची वैधता मिळणार आहे. त्यानुसार या प्लॅनमध्ये दररोज १६८ जिबी डेटा आणि १०० एसएमएस तुम्ही करू शकतात.
वर नमूद केलेल्या सर्व जिओ रिचार्ज प्लॅनसह, JioCinema, JioTV, Jio Security, Jio News आणि Jio Cloud सारख्या Jio अॅप्समध्ये एक्सेस मोफत देण्यात आला आहे.