डोक्यावर जोरदार आघात झाल्यावर मेंदूचे आरोग्य ज्याप्रमाणात बिघडू शकते त्याच प्रमाणात सातत्याने रात्रीची झोप चांगली न झाल्यास मेंदूवर आघात होऊ शकतो. रात्रीच्या झोपेबद्दल जागृत नसऱ्याणांना नव्याने करण्यातआलेल्या एका अभ्यासामधून हा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
स्विडन स्थित उपसाला विद्यापीठाच्यावतीने करण्यात आलेल्या अभ्यासामधून हे निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत. निद्रानाशामुळे माणसाला अनेक नवनव्या व्याधिंची जडण होत असल्याचा दावा या अभ्यासावर कामकरणाऱ्या संशोधकांनी केला आहे. रात्रीच्या झोपेच्या सातत्याच्या अभावाने तरूणांच्या मेंदूमध्ये ‘एनएसइ’ व ‘एस-१००बी’ या प्रकाराचे रेणू तयार होत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. या रेणूंमुळे मेंदूच्या पेशींना मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
साधारण वजन असलेल्या १५ व्यक्तिच्या झोपेविषयक नोंदी व वेगवेगळ्या चाचण्यांच्या अंती संशोधकांनी त्यांची निरिक्षणे नोंदवली असल्याचे उपसाला विद्यापीठाच्या न्यूरोसायन्स विभागाचे संशोधक प्राध्यापक ख्रिस्टीन बेनेडिक्ट यांनी सांगितले.
मेंदूच्या आरोग्यासाठी झोप गरजेची!
डोक्यावर जोरदार आघात झाल्यावर मेंदूचे आरोग्य ज्याप्रमाणात बिघडू शकते त्याच प्रमाणात सातत्याने रात्रीची झोप चांगली न झाल्यास मेंदूवर आघात होऊ शकतो
आणखी वाचा
First published on: 01-01-2014 at 04:52 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good nights sleep crucial for brain health