मलेरिया आणि डेंग्यूसारख्या ४०० हून अधिक आजारांची माहिती गुगल अॅपवर उपलब्ध करून दिल्याने गुगल वापरकर्त्यां भारतीयांसाठी आरोग्यविषयक समर्पक माहिती उपलब्ध होणार आहे.
गुगलचा वापर करणाऱ्यांना याविषयाची माहिती नव्याने तयार केलेल्या अॅन्ड्रॉइड गुगल अॅपच्या तक्त्यावर किंवा अॅपल फोन आणि टॅबलेटसोबतच मोबाइल आणि संगणक हाताळणाऱ्यांनादेखील उपलब्ध होणार आहे. यासाठी ‘अपोलो हॉस्पिटल’ आणि ‘कोलंबिया एशिया हॉस्पिटल’ यांच्यासोबत आरोग्यविषयक संकलित माहितीचा आणि सामग्रीचा आढावा घेतला जात आहे. गुगलचा वापर करणाऱ्यांसाठी आजारांची लक्षणे आणि त्याच्या सद्यपरिस्थितीविषयक म्हणजेच गंभीर, सांसर्गिक आणि अन्य माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील असल्याचे गुगलचे वरिष्ठ उत्पादन व्यवस्थापक प्रेम रामास्वामी यांनी सांगितले.
अमेरिका आणि ब्राझीलनंतर माहितीविषयक वाढता आलेख असलेला भारत हा तिसरा देश असून यात सर्वसामान्य स्थानिक परिस्थितीचा अंतर्भाव असलेली ही माहिती भारतीयांसाठी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
रामास्वामी यांच्या मते, आरोग्य-विषयक माहिती जाणून घेण्यासाठी जगभरातील लोक उत्सुक असून गुगल हे त्यांचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. तर गुगलवर शोधण्यात येणाऱ्या वीस माहितींपैकी आरोग्यविषयक माहिती त्यापैकी एक असून हा शोध आरोग्यविषयक सल्ल्याच्या अनुषंगाने नसून केवळ माहिती संकलित करण्याच्या अनुषंगाने असते. त्यामुळेच लोकांच्या आरोग्यविषयक माहितीबाबत वैद्यकीय तज्ज्ञांशी सल्लामसलत करण्याबाबत आग्रही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठीच ही संकल्पना अस्तित्वात आणण्यापूर्वी गुगलकडून ‘ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स’ आणि ‘आशा’ (समूह आरोग्यसेवक) यांच्याशी विचारविनिमय केल्यावर तयार करण्यात आलेला हा तक्ता उपयुक्त असल्याबाबतची खात्री करण्यात आली आहे.
गुगलकडून आरोग्यविषयक माहिती देणारे ‘अॅप’ उपलब्ध
माहिती गुगल अॅपवर उपलब्ध करून दिल्याने गुगल वापरकर्त्यां भारतीयांसाठी आरोग्यविषयक समर्पक माहिती उपलब्ध होणार आहे.
First published on: 09-04-2016 at 01:20 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google medical and health apps