विविध विषयांवरील नवनवीन माहिती मिळविण्यासाठी गुगलचा सर्रास वापर केला जातो. मात्र, गुगलच्या अतिवापरामुळे मेंदूवर अधिक ताण पडून स्मृतिभ्रंशाचा धोका वाढत असल्याचा इशारा ब्रिटनमधील संशोधकांनी दिला आहे.

संशोधकांकडून सध्या स्वत:वरच प्रयोग सुरू आहे. मेंदूच्या आरोग्यासाठी त्याला चालना देणे योग्य असले तरी सध्या इंटरनेटचा वाढता वापर काळजी वाढविणारा असल्याचे ब्रिटनमधील सेंट अँन्ड्रयु विद्यापीठातील अभ्यासक फ्रँक गन मूर म्हणाले.

एखाद्या विषयाची माहिती हवी असल्यास सर्वच जण इंटरनेटचा वापर करतात. किंवा ती माहिती वाचलेली असल्यास आठवण्याचा प्रयत्न करतात, असेही निरीक्षण मूर यांनी नोंदविले. गुगलचा किंवा मेंदूला ताण देण्यामुळे स्मृतीभ्रंशाचा विकार कसा उद्भवू शकतो, याबाबतचे संशोधन सुरू असून त्याचे परिणाम शोधण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे, मूर म्हणाले. स्कॉटलंड येथील वार्षिक कार्यक्रमात बोलताना मूर यांनी याबाबतची माहिती दिली. २०१५मध्ये जगभरात स्मृतिभ्रंशाचा विकार झालेल्यांची संख्या ४५ दशलक्ष होती. १९९०च्या तुलनेत ती दोन पटींनी अधिक होती.

Story img Loader