गुगलचा बहुप्रतीक्षित Google Pixel 3 आणि Pixel 3 XL आज लाँच होणार आहे. गुगलचे दोन्ही स्मार्टफोनची लाँचिंग भारतीय वेळेनुसार आज रात्री ८ वाजून ३० मिनीटांनी होणार आहे. लाँचिंगचा कार्यक्रम गुगलच्या YouTube चॅनलवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. आज लाँच होणारे गुगलचे दोन्ही स्मार्टफोन आधीच्या फोनचे अपडेटेड व्हर्जन असणार आहे. लाँचिंगपूर्वीच या दोन्ही फोनचे फोटो आणि फिचर्स लीक झाले आहेत. Pixel 3 XL मध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा असणार आहे. तर Pixel 3 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये दोन स्पीकर्स देण्यात आले आहेत. तर Pixel 3 XL मध्ये मागील बाजुला फिंगर प्रिंट सेन्सर आणि ड्युअल कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लीक झालेल्या माहितीनुसार Pixel 3 XL मध्ये ६.२ इंचाचा QHD+ डिस्प्ले १४४० x २८८० रिझोल्यूशनचा असणार आहे. पिक्सलचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्प्ले असेल. Pixel 3 मध्ये ५.५ इंचाचा QHD+ डिस्प्ले १०८० x २१६० रिझोल्यूशनचा असणार आहे. Google Pixel 3 आणि Pixel 3 XL चे दोन्ही स्मार्टफोन सर्व रंगामध्ये उपलब्ध असणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने काळा आणि पांढरा रंग महत्वाचा आहे. दोन्ही फोनमध्ये वायरलेस चार्जिंग असणार आहे. तसेच स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर आणि ४ जीबी रॅम असण्याची शक्यता आहे. तसेच दोन्हीमध्ये Android 9.0 Pie ऑपरेटींग सिस्टिम असणार आहे.

Google Pixel 3 आणि Pixel 3 XL ६४ जीबी आणि १२८ जीबी च्या स्टोरेजमध्ये उपलब्ध असणार आहे. फोनमध्ये माइक्रो एसडी कार्ड लावूही शकतो. Pixel 3मध्ये 3,915 mAh आणि Pixel 3 XL मध्ये 3,430 mAh ची बॅटरी असणार आहे. दोन्ही फोनमध्ये 4G VoLTE, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस/ए-जीपीएस आणि टाइप सी यूएसबी देण्यात आले आहे. आतापर्यंत Google Pixel 3 आणि Pixel 3 XL बद्दलची लीक झालेली माहिती कितपत खरी आहे ते आज रात्री लाँचिंगनंतरच समजेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google pixel 3 and pixel 3 xl are scheduled to launch today
Show comments