१० वी आणि १२ वी उत्तीर्णांपासून अगदी ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट्सपर्यंत सर्वांसाठी सरकारी नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. सध्या विविध विभागांमध्ये ही भरती प्रक्रिया सुरु आहे. आम्ही तुम्हाला याच विविध विभागांतील सरकारी नोकऱ्यांविषयी सांगणार आहोत. एअर इंडिया एक्स्प्रेस लिमिटेड, इंडिया पोस्ट, केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC), RITES यांसह अनेक विभागांतील रिक्त पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती…
केंद्रीय लोकसेवा आयोगामधील (UPSC) अनेक पदं रिक्त
- केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) सहाय्यक संचालक, रिसर्च ऑफिसर्स आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
- इच्छुक उमेदवार १३ ऑगस्ट २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीद्वारे या पदासाठी अर्ज करू शकतात.
- सहाय्यक संचालक, रिसर्च ऑफिसर्स व इतर अशा एकूण ४६ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडमध्ये पदभरती
एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडने (AIEL) airindia.in या आपल्या अधिकृत वेबसाईटवर बीपीओ टीम लीडर, मॅनेजर- ट्रेड सेल्स, ऑफिसर/एएम, असिस्टंट मॅनेजर/डेप्युटी मॅनेजर/मॅनेजर, स्टेशन मॅनेजर, एजीएम, हेड, आयटी, सिनिअर सुपरवायझर आणि ग्राउंड इंस्ट्रक्टर या पदांकरिता अधिसूचना जारी केली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार १७ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑफलाइन पद्धतीने एअर इंडिया भरती २०२१ साठी अर्ज करू शकतात.
अर्ज कसा करावा?
एअर इंडिया भरती २०२१ साठी इच्छुक उमेदवार सीव्ही आणि अर्ज दाखल करू शकतात. यासाठी इच्छुक उमेदवारांना आपली जन्मतारीख, जात, पात्रता, अनुभव, पगार इत्यादींची माहिती असलेल्या कागदपत्रांचा फोटो कॉपीचा एक संच पुढील पत्त्यावर पोस्ट किंवा स्पीड पोस्टद्वारे पाठवता येईल.
पत्ता : एलायन्स एअर कार्मिक विभाग युती भवन, डोमेस्टिक टर्मिनल -१, आयजीआय विमानतळ, नवी दिल्ली -११०३७३७ या पत्त्यावर उमेदवार १७ ऑगस्ट २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी दाखल करू शकतात.
अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा
- बीपीओ टीम लीडर, हेड अँड ग्राऊंड इन्स्ट्रक्टर: ५५ वर्षे
- ऑफिसर / एएम : ५० वर्षे
- एजीएम : ५५ वर्षे / ५९ वर्षे
- सुपरवायझर : ३५ वर्षे
- इतर पदे: ४० वर्षे
बीपीओ टीम लीडर आणि एजीएम पदासाठी पात्रता काय?
- बीपीओ टीम लीडर – मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून पदवीधर. टीम लीडर म्हणून किमान १ वर्षाचा अनुभव, एअर लाइन्सच्या कॉल सेंटर / बीपीओमध्ये काम करण्याचा किमान २ वर्षांचा अनुभव.
- एजीएम – किमान १० वर्षांच्या कामाचा अनुभव असलेले पदवीधर
इंडिया पोस्टमध्ये नोकरीची संधी
- इंडिया पोस्टने पंजाब पोस्टल सर्कलमधील पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफच्या केडरमधील गुणवंत खेळाडूंच्या भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना जारी केली आहे.
- सर्व इच्छुक उमेदवार १८ ऑगस्ट २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.
- एकूण ५७ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अधिसूचनेनुसार पोस्टल असिस्टंटची ४५ पदं, सॉर्टिंग असिस्टंटची ९ पदं आणि मल्टी-टास्किंग स्टाफची ३ पदं रिक्त आहेत.
इंडिया पोस्ट नोकरीसाठी पात्रता
- पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी उत्तीर्ण किंवा समतुल्य असणं आवश्यक.
- उमेदवारांना केंद्र सरकार / राज्य सरकार / विद्यापीठ / बोर्ड इत्यादींकडून मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्रातून मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक
- मल्टी-टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी किंवा समकक्ष उत्तीर्ण असणं आवश्यक
- संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या स्थानिक भाषेचं ज्ञान. उमेदवारानं किमान १० वीपर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असावा.
इंडिया पोस्टसाठी असा करा अर्ज
- इच्छुक उमेदवारांनी आपल्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर स्पीडपोस्ट किंवा नोंदणीकृत पोस्टाद्वारे आपला अर्ज दाखल करावा.
- पत्ता : सहाय्यक संचालक डाक सेवा (भरती), मुख्य पोस्टमास्टर जनरलचे कार्यालय, पंजाब सर्कल, सेक्टर – १७, संदेश भवन, चंदीगड – १६००१७
- अर्ज केलेल्या पदाचे नाव पाकिटाच्या वरच्या बाजूला लिहिणं आवश्यक आहे.
- खासगी कुरिअर, नोंदणी नसलेले पोस्ट, सामान्य पोस्ट, अन्य माध्यमांद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, ह्याची नोंद घ्यावी.
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडूनही (SSC) भरतीची अधिसूचना जारी
स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) आपल्या अधिकृत वेबसाइटवर कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) आणि रायफलमन (जनरल ड्यूटी) या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यावर्षी आयोगाद्वारे मोठ्या प्रमाणात रिक्त जागांवर पद भरतीची घोषणा केली आहे. एसएससी जीडी कॉन्स्टेबल नोंदणी १७ जुलै २०२१ पासून सुरू झाली आहे. SSC कॉन्स्टेबल भरती २०२१ अर्ज लिंक SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत उपलब्ध असेल.
ITBP भरती प्रक्रिया
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल आयटीबीपी कॉन्स्टेबल भरती २०२१ साठी नोंदणी ५ जुलै २०२१ पासून सुरू करेल. ही भरती खेळाडूंसाठी आहे आणि पदासाठी पात्र उमेदवार recruitment.itbpolice.nic.in वर ITBP च्या अधिकृत साइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०२१ आहे.
छत्तीसगड लोक सेवा आयोगातील पदभरतीला सुरुवात
छत्तीसगड लोक सेवा आयोगाने (सीजीपीएससी) पशुवैद्यकीय सहाय्यक शल्य चिकित्सक पदाच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवार २ रिक्त जागांसाठी अधिकृत वेबसाइट psc.cg.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने पदांवर अर्ज करू शकतात. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १७ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होईल आणि १५ सप्टेंबर २०२१ रोजी संपेल.
APSWREIS च्या भरती प्रक्रियेलाही सुरुवात
आंध्र प्रदेश सोशल वेल्फेअर रेसिडेन्शिअल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनल सोसायटीने (APSWREIS) आयआयटी मेडिकल अकॅडमीसाठी (IIT-Medical Academy) गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या वरिष्ठ विद्याशाखा पदांच्या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यास सांगितलं आहे. सर्व इच्छुक उमेदवार 10 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करू शकतात.
RITES अभियंता भरती २०२१
RITES Limited ने परिवहन, पायाभूत सुविधा आणि संबंधित तंत्रज्ञान क्षेत्रात अभियंता पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. आवश्यक पात्रता आणि अनुभव असलेले उमेदवार २५ ऑगस्ट २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी rites.com या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ३० जुलै २०२१ पासून सुरू होईल.
रिक्त पदांचा तपशील
- अभियंता (सिव्हिल) – २५ पदं
- अभियंता (मेकॅनिकल) – १५ पदं
- अभियंता (इलेक्ट्रिकल) – ८ पदं
पात्रता / शैक्षणिक पात्रता
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात बीई /बी.टेक/बी.एससी (अभियांत्रिकी) पदवी.
- वयोमर्यादा- ३२ वर्षे
- वेतन- रु. ४०,००० ते १, ४०,०००/-
उमेदवार निवडीचे निकष
- पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेला (ऑफलाइन/ऑनलाईन) उपस्थित राहावे लागेल.
- लेखी परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर उमेदवार निवडले जाऊ शकतात.
अर्ज कसा करावा?
- पात्र उमेदवार ३० जून ते २५ ऑगस्ट २०२१ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पदाची आवश्यक अटी आणि आवश्यकता पूर्ण करणे अनिवार्य आहे.
अर्जाची फी
- सामान्य/ओबीसी उमेदवार रु. ६००/- अधिक लागू असलेला कर
- ईडब्ल्यूएस/ एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवार रु. ३००/- अधिक लागू असलेला कर