Sunita Ahuja Shares Her Morning Routine : बॉलीवूडचा ९० च्या दशकातील सुपरस्टार अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने (Sunita Ahuja) अलीकडेच ‘पिंकविला हिंदी रश’शी बोलताना तिच्या दिवसाची सुरुवात कशी होते याबद्दल खुलासा केला. सुनीता आहुजा (Sunita Ahuja )रात्री ९.३० वाजता झोपते आणि पहाटे ३.३० ते ४ च्यादरम्यान उठते. नंतर ती एक तास ध्यान करते. मग पहाटे ५ वाजता एक तास चालण्यास जाते आणि परत येऊन योगा करते, यामुळे कुटुंबातील प्रत्येक जण तिला ‘लेडी अक्षय कुमार’ म्हणतात.
कारण बॉलीवूडचा अभिनेता अक्षय कुमारदेखील त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी ओळखला जातो. त्याला सकाळी लवकर उठून स्वतःसाठी वेळ द्यायला आवडते. त्याचे संपूर्ण कुटुंब जागे होण्याआधी त्याचे वर्कआउट पूर्ण झालेले असते. तर अशा जीवनशैलीचा आरोग्यासाठी कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली.
दिल्लीच्या सीके बिर्ला हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसिनचे मुख्य सल्लागार, डॉक्टर नरेंद्र सिंगला या रुटीनबाबत म्हणाले की, पहाटे ४ वाजता उठल्याने अनेक फायदे मिळतात. पण, वैयक्तिक परिस्थितीनुसार परिणाम बदलू शकतात. लवकर उठल्याने दिवसाची सुरुवात चांगली होते, यामुळे प्रेडिक्टिव्हिटी वाढते आणि उत्तम वेळेचे व्यवस्थापन होते. सकाळचे शांत वातावरण तुम्हाला मानसिक स्पष्टता, क्रिएटीव्हीटी आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे लक्ष्य निश्चित करणे, समस्या सोडवणे, वैयक्तिक अक्टिव्हिटी, जसे की ध्यान, जर्नलिंग किंवा वाचन यांसारख्या कार्यांसाठी एक आदर्श वेळ ठरू शकते.
सकाळी ४ वाजता उठणे वजन व्यवस्थापनास समर्थन देऊन, उर्जेची पातळी वाढवून, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या जुनाट आजारांचा धोका कमी करून शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. सकाळी ४ वाजता उठण्याने दिवसभर शांत, नियंत्रण ठेवण्याची भावना निर्माण करून तणाव कमी करू शकतो; असे डॉक्टर नरेंद्र सिंगला म्हणाले आहेत.
या फायद्यांचा अनुभव घेण्याची टाइमलाइन प्रत्येक व्यक्तींमध्ये भिन्न असते. काही जण एक ते दोन आठवडे करतात. काहींना शरीराला अनुकूलता आल्याने कंटाळवाणे किंवा थकवा जाणवू शकतो किंवा काही जणांच्या ऊर्जा, फोकस आणि उत्पादनक्षमतेमध्ये लक्षणीय सुधारणा दोन ते चार आठवड्यांत दिसून येते. तर कोणाला एकूण आरोग्य आणि कल्याणातील लक्षणीय फायद्यांमध्ये सातत्य राहण्यासाठी सहा ते बारा आठवडे लागू शकतात, असे डॉक्टर म्हणतात.
पण, जसे याचे आरोग्य फायदे आहेत तसेच हे रुटीन फॉलो करताना अनेक समस्या उद्भवू शकतात. पहाटे ४ वाजता उठल्याने पुरेशी झोप न मिळाल्यास, झोप अपूर्ण राहू शकते किंवा शारीरिक, मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. झोपेतून उठण्याच्या वेळेत अचानक होणारे बदलदेखील नैसर्गिक सर्केडियन लयमध्ये व्यत्यय आणू शकतात, ज्यामुळे निद्रानाश, पाचन समस्या किंवा मूड बदलू शकतात. याव्यतिरिक्त, अशा शेड्यूलसाठी जीवनशैली समायोजन आवश्यक असू शकते, ज्यामुळे सामाजिक, कौटुंबिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. संभाव्यतः आयसोलेशनची भावना निर्माण होऊ शकते, असे डॉक्टर म्हणाले आहेत.
तुम्हाला ही दिनचर्या फॉलो कारण्यासाठी काय करावे लागेल?
सकाळी ४ वाजता उठण्याची दिनचर्या स्वीकारण्यासाठी, शरीराला वेळेनुसार समायोजन करण्यास अनुमती देऊन हळूहळू बदल अमलात आणणे महत्वाचे आहे. झोपेचे वेळापत्रक राखणे, सकाळची योग्य दिनचर्या तयार करणे आणि झोपायच्या आधी स्क्रीन टाळणे यामुळे झोपेची गुणवत्ता वाढू शकते. तसेच रुटीन पाळताना लवचिकतादेखील महत्त्वाची आहे. एक किंवा दोन दिवस रुटीन पाळल्यानंतर दिनचर्या विस्कळीत होऊ नये याची काळजी घ्या.