नियमित द्राक्षे खाल्ल्याने अल्झायमर (स्मृतिभ्रंश) आजार कमी होण्यास मदत होत असून, मेंदूची कार्यक्षमता आणि स्मृती सुधारण्यास यामुळे मदत होत असल्याचा दावा नव्या अभ्यासात करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवसातून दोन वेळा याप्रमाणे सहा महिने द्राक्षे खाल्ल्याने लवकर स्मृती कमी झालेल्या व्यक्तींच्या मेंदूमधील स्मृतिभ्रंश संबंधित भागातील चयापचय क्रियेत घट होत असलेल्या भागाचे संरक्षण होत असल्याचे दिसून आले आहे.

चयापचयाची क्रिया या भागातील कमी झाल्यामुळे स्मृतिभ्रंश होण्यास काराणीभूत ठरत असते. लॉस एंजेल्समधील कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या या संशोधनानुसार, द्राक्षसमृद्ध आहार घेतल्यामुळे चयापचयाच्या क्रियेमधे घट न होता त्याचे संरक्षण होते.

द्राक्षे खाणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूमधील अन्य भागांमध्येही चयापचयाची क्रिया वाढल्याचे दिसून येते. द्राक्ष न खाणाऱ्यांच्या तुलनेत द्राक्ष खाणाऱ्यांमध्ये एखाद्या कामामध्ये वैयक्तिक लक्ष देण्यामध्ये सुधारणा होत असून, स्मरणशक्तीमध्ये वाढ होत असल्याचे अभ्यासात दिसून आले.

एक संपूर्ण फळ म्हणून द्राक्ष खाणाऱ्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतात, तसेच स्मृतिभ्रंशसंबंधित आजारांपासून कशा प्रकारे संरक्षण होते याबाबत हे संशोधन करण्यात आले, असे प्रमुख संशोधक डॅनियल ए सिल्वेरमॅन यांनी सांगितले.

द्राक्षे खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होत असून, मेंदूला शुद्ध रक्तपुरवठा होण्यास यामुळे मदत होते. यामुळे मेंदूतील रासायनिक पातळी नियंत्रणात राहून स्मरणशक्ती वाढत असल्याचे संशोधकांनी माहिती देताना सांगितले.

हे संशोधन एक्स्पेरिमेंटल जेरोन्टोलॉजी नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.