तिखट हिरव्या मिरचीमुळे जेवणाची चव वाढते. मिरचीचा वापर जेवणात अधिक प्रमाणात केला जातो…कोणत्याच पादर्थाला मिरची घातल्याशिवाय चव येत नाही. मिरची जेवणाला तिखट आणि मसालेदार बनवते. भाज्या असोत, डाळी असोत किंवा कोणताही मांसाहारी पदार्थ असो, प्रत्येक डिश स्वादिष्ट बनवण्यासाठी मिरचीचा वापर केला जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जेवणात आपण वापरत असलेल्या हिरव्या आणि लाल मिरच्या या दोनपैकी कोणती मिरची जास्त फायदेशीर आहे? चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जाणून घ्या हिरवी मिरची का फायदेशीर आहे

संशोधनानुसार, मिरचीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि इतर पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. पण मिरचीचे नियमित सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिनचे प्रमाण लाल मिरचीपेक्षा कमी असते, ज्यामुळे ती पचनसंस्थेसाठी अधिक उपयुक्त ठरते. हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह यासारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. हिरव्या मिरचीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. हिरवी मिरचीचे नियमित सेवन केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि आरोग्य सुधारते. त्यामुळे लाल मिरचीपेक्षा हिरव्या मिरचीचे सेवन अधिक फायदेशीर मानले जाते.

हिरवी मिरची वजन कमी करते

हिरव्या मिरचीचे सेवन पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. हिरव्या मिरचीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करते. बद्धकोष्ठता दूर होते. तसेच हिरव्या मिरचीमध्ये असलेले एन्झाइम अन्न पचण्यास मदत करतात. याशिवाय हिरव्या मिरचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात जे पोटात जळजळ आणि संसर्ग टाळतात. त्यामुळे हिरवी मिरचीचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि वजन कमी करण्यासही मदत करते.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते

हिरव्या मिरचीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. हिरव्या मिरचीचे नियमित सेवन केल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते. याशिवाय हिरवी मिरची रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते.

हेही वाचा >> Kitchen Tips: फ्रीजमध्ये अंडी ठेवणं योग्य की अयोग्य? वाचा सविस्तर माहिती

या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. कोणताही उपाय करून पाहण्याआधी संबंधित आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green chilli or red chilli which one is healthier green chilli is one of the best remedies for diabetes srk