आजच्या काळात मधुमेह हा एक सामान्य आजार झाला आहे, ज्याचे रुग्ण वाढत आहेत. मधुमेह हा एक असा आजार आहे जो केवळ नियंत्रणात ठेवता येतो, परंतु यातून कायमची सुटका होणे जरा अशक्यच आहे. हा एक जीवनशैलीचा आजार आहे ज्यामध्ये कमी इंसुलिन उत्पादनामुळे समस्या निर्माण होतात आणि शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते.

अनेक लोकं मधुमेह नियंत्रित करण्यासाठी अनेक औषधे घेतात आणि काही लोकं आयुर्वेदिक पद्धतींनी रक्तातील साखर नियंत्रित करतात. अशातच मधुमेह रुग्णांनी मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुर्वेदिक औषधे आणि घरगुती उपाय देखील अवलंबू शकता. असाच एक आयुर्वेदिक उपाय आहे जो तुम्ही अवलंबून रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेऊ शकता.

रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही जेवणात भाजीमध्ये मसाला म्हणून आणि एखादा पदार्थ गार्निशसाठी वापरली जाते ती म्हणजे कोथिंबीर. कोथिंबिरीच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते, तर या हिरव्या कोथिंबीरीच्या पाण्याचा वापर करून तुम्ही रक्तातील साखर नियंत्रित करू शकता.

सकाळी रिकाम्या पोटी हिरव्या कोथिंबिरीचे पाणी प्यायल्याने अनेक समस्या कमी होतात असे आयुर्वेद सांगतो. विशेषतः रक्तातील साखर नियंत्रणात राहते. वास्तविक हिरव्या कोथिंबिरीमध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्याची क्षमता असते. हिरवी कोथिंबीर शरीरातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते आणि त्याच्या सेवनाने आपोआप इन्सुलिनचे प्रमाण वाढते. या कारणामुळे शरीरातील रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे खूप फायदेशीर आहे.

तसेच हेही लक्षात ठेवा की जर तुमच्या रक्तातील साखर कमी झाली असेल तर तुम्ही कोथिंबिरीचे पाणी पिऊ नये, यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक कमी होईल आणि आजार अधिक वाढू शकतो.

यासोबतच वजन कमी करण्यासाठी हिरव्या कोथिंबिरीच्या पाण्याची भर पडत नाही. दररोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने चयापचय गतिमान होते आणि वजन झपाट्याने कमी होते. थायरॉईडच्या रुग्णांसाठी कोथिंबीरीचे पाणी खूप फायदेशीर आहे.

हिरव्या कोथिंबीरचे पाणी कसे तयार करावे

स्वच्छ हिरवी कोथिंबीरी घ्या.

कोथिंबीर स्वच्छ धुवून त्याची पाने वेगळी करून दोन चमचे पाण्यात मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

आता हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या आणि गॅसवर उकळण्यासाठी ठेवा.

थोडा वेळ उकळल्यानंतर थंड होऊ द्या त्या नंतर हे मिश्रण ग्लासमध्ये भरा.

आता त्यात चवीनुसार काळे मीठ आणि लिंबू टाकून प्या.

अशा पद्धतीने साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हिरव्या कोथिंबीरीचे पाणी तयार करा.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा व फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Story img Loader