Green Tea: ग्रीन टी हा दुधाच्या चहाऐवजी सर्वात चांगला पर्याय मानला जातो. ग्रीन टी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असून यामुळे अनेक समस्यांपासून सुटका होते. हे केवळ आपल्याला ताजेतवाने करत नाही तर आपले शरीर आतून स्वच्छ करण्यास देखील मदत करते. ग्रीन टीमुळे चयापचय सुधारते, पचन चांगल्या प्रकारे होऊन वजन कमी होण्यासही मदत होते. ग्रीन टीमध्ये असलेले गुणधर्म केवळ आपले शरीर निरोगी ठेवत नाहीत तर वजन कमी करण्यासही मदत करतात. ग्रीन टीचे फायदे अनेक आहेत, पण याचे सेवन करताना काही बाबींची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा याचा वाईट परिणाम भोगावा लागू शकतो. तुम्हाला माहीत आहे का, आपण एका दिवसात किती ग्रीन टी प्यायला पाहिजे? चला याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जाणून घ्या, ग्रीन टी किती वेळा प्यावी?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दिवसभरात २ किंवा ३ कप ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. एवढ्या प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने त्याचे फायदे मिळतात आणि कोणतेही नुकसान होत नाही. ग्रीन टीमध्ये अनेक चांगले घटक असतात जे आपले शरीर निरोगी ठेवतात. हे आपले हृदय मजबूत करते, आपले वजन नियंत्रित करते आणि आपल्याला ताजेतवाने वाटते. त्यामुळे दररोज एवढ्या प्रमाणात ग्रीन टी प्यायल्यास आपले आरोग्य चांगले राहते.

ग्रीन टी पिताना ‘या’ चुका करु नका

  • ग्रीन टी मर्यादित प्रमाणात पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण जर आपण ते जास्त प्रमाणात प्यायलो तर नुकसान देखील होऊ शकते. ग्रीन टीमध्ये कॅफिन असते. जर आपण जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायलो तर आपल्या शरीरात कॅफिनचे प्रमाण वाढते. यामुळे आपल्याला निद्रानाश, चिडचिड, डोकेदुखी आणि हृदयाचे ठोके वाढणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
  • दुसरे म्हणजे, ग्रीन टीमध्ये टॅनिन देखील असतात जे लोहाचे शोषण कमी करू शकतात. याचा अर्थ असा की जर आपण अन्नासोबत किंवा जेवणानंतर लगेचच जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायलो तर आपल्या शरीराला अन्नातून लोह योग्य प्रकारे मिळू शकत नाही. यामुळे रक्ताची कमतरता किंवा ॲनिमिया होऊ शकतो.
  • जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने पोटदुखी आणि अपचन सारख्या समस्या उद्भवू शकतात. कारण ग्रीन टीमुळे ॲसिडिटी वाढू शकते, ज्यामुळे पोटात जळजळ होऊ शकते.

हेही वाचा >> तुमची झोप पूर्ण होत नाही का? तुमच्या ‘या’ पाच सवयींमुळे बिघडते तुमचे चयापचय

ग्रीन टी बॅग्ज पुन्हा वापरणे टाळा. कारण टी बॅग्ज पुन्हा वापरल्याने चहाची चव चांगली राहत नाही. तसेच हा चहा आरोग्यदायी ठरत नाही. यामुळे तुम्हाला पुरेसे पोषण मिळत नाही. प्रत्येक वेळी ग्रीन टी पिताना नेहमी ताजी पाने किंवा नवीन टी बॅग वापरा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green tea health benefits how much green tea should one drink in a day srk