महिलांच्या सौंदर्यात त्यांच्या काळ्याशार केसांचे महत्व जास्त असतं. केसांची काळजी घेणे आणि ते सांबसडक होण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. आजकाल बाजारात अनेक प्रकारचे शॅम्पू उपलब्ध आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या या शॅम्पूमध्ये रसायनांचे प्रमाण जास्त असते. त्यामूळे केसांना हानी पोहोचण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत, केसांची योग्य काळजी घेण्यासाठी हर्बल शॅम्पू वापरणं फार उपयुक्त आहे. तुम्ही घरच्या घरी सुद्धा हर्बल शॅम्पू बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला ग्रीन टी हर्बल शॅम्पू बद्दल सांगणार आहोत. ग्रीन टी केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचा आणि केसांसाठीही खूप उपयुक्त मानलं जातं. ग्रीन टी मधून हर्बल शॅम्पू कसा बनवायचा ते जाणून घेऊया.
ग्रीन टी शॅम्पू कसा बनवायचा?
सामग्री:
हिरव्या चहाची पाने
पेपरमिंट तेल
लिंबाचा रस
खोबरेल तेल
मध
अॅपल सायडर व्हिनेगर
शॅम्पू बनवण्याची पद्धत:
सर्वप्रथम ग्रीन टीच्या पानांना सुकवून त्याची पावडर बनवा. ग्रीन टी पावडरमध्ये एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा. ग्रीन टी आणि अॅपल सायडर व्हिनेगर मिश्रणात पेपरमिंट तेलाचे दोन थेंब मिसळा. यानंतर, या मिश्रणात लिंबाचा रस, खोबरेल तेल आणि मध मिसळा.
ग्रीन टी शॅम्पूचे फायदे
ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, अमीनो अॅसिड आणि झिंक सारख्या पोषक घटकांचा समावेश असतो. हे पोषक घटक केसांच्या वाढीसाठी उपयुक्त मानले जातात. ग्रीन टी वापरल्याने केसांमधील कोंडा होण्याची समस्या दूर होते. ग्रीन टी शॅम्पूने केसांची मालिश केल्याने रक्त परिसंचरण सुधारतं, ज्यामुळे केस जाड आणि मजबूत होतात.
यामुळे तुमचे केस खूप कमी वेळात लांबसडक तर होतीलच. पण केस गळतीही थांबेल. विशेष म्हणजे हा शॅम्पू तुम्हाला घरी बनवता येणार असल्याने कोणताही खर्च करण्याची गरज नाही.
मध या शॅम्पूमधला आणखी एक उत्तम घटक आहे आणि एक उत्तम मॉइश्चरायझर सुद्धा आहे. केस चमकदार आणि निरोगी ठेवण्यास, त्यांना बळकट करण्यास मध उपयुक्त असतो.