Home Remedies for Ants: एखादा गोड पदार्थ खाताना जमिनीवर पडला तर त्याठिकाणी काही वेळानंतर लगेच मुंग्या आलेल्या दिसतात. त्यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात मुंग्यांच्या रांगा लागताना दिसतात. कालांतराने या मुंग्यांचा वावर एवढा वाढतो, की नंतर या मुंग्या बिछान्यात आणि कपड्यात दिसू लागतात. अशावेळी या मुंग्या तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. घरात मुंग्यांची दहशत केवळ मानसिकच नाही तर धार्मिक दृष्टिकोनातूनही वाईट मानली जाते. अशावेळी केमिकल औषधांचा वापर न करता तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करून देखील या मुंग्यांपासून मुक्ती मिळवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंग्यांपासून सुटका मिळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय

१) लाल तिखट

घरात जर जास्त मुंग्यांचा वावर झालेला असेल तर तुम्ही लाल तिखटचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही थोडी लाल तिखट घ्या आणि ज्या जागी मुंग्या असतील तिथे टाका. असं केल्याने थोड्यावेळातच सर्व मुंग्या जागेहून नाहीशा झालेल्या दिसतील. तसंच पुन्हा तुम्हाला मुंग्यांचा त्रास होणार नाही.

२) मीठ

मीठ मुंग्यांना घालवण्यासाठी सर्वात चांगला मार्ग आहे. यासाठी पाण्यात मीठ घालून, पाणी चांगले उकळवा. हे पाणी थंड झाल्यावर एका स्प्रेअरमध्ये भरा. त्यानंतर ज्या ठिकाणी मुंग्या दिसतील तिथे हा स्प्रे करा. याने मुंग्या मरतील आणि पुन्हा येणार नाहीत.

( हे ही वाचा: घरातील कीटक आणि डासांचा त्रास होतोय ? तर ‘या’ वनस्पतींची घ्या मदत)

३) लवंग

लवंगाचा वापर मुंग्या तसंच किडे देखील दूर करण्यासाठी केला जातो. लवंगाचा वास खूप तीव्र असतो, त्यामुळे मुंग्या आणि किडे लगेच नाहीशे होतात. यासाठी ज्या ठिकाणी मुंग्या असतील तिथे लवंगाचे ३ ते ४ काड्या घाला. मुंग्या लवंगाच्या वासाने लगेच नाहीश्या होतील.

४) व्हिनेगर

व्हिनेगर जसा जेवणात वापरला जातो तसाच त्याचा उपयोग मुंग्या घालवण्यासाठी देखील केला जातो. यासाठी पाणी आणि व्हिनेगर समान प्रमाणात मिसळून घराच्या अशा कोपऱ्यांवर ठेवा जेथे मुंग्यांची जास्त हालचाल होत असेल. दिवसातून अनेक वेळा हा उपाय करा. मुंग्यांना व्हिनेगरचा वाईट वास सहन होत नाही आणि त्या तेथून निघून जातात.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)