Gudi Padwa 2025: मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात अन् उत्साहात साजरा केला जातो. कुटुंबासह अगदी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून विधीवत पूजा केली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस सर्व प्रकारचे वैभव घेऊन येतो असं म्हणतात. चला तर मग यानिमित्ताने जाणून घेऊ या, या गुढीपाडव्यादिवशी तुम्ही कोणकोणत्या अस्सल मराठी रेसिपी घरी बनवू शकता…
पुरणपोळी
महाराष्ट्रात मिळणाऱ्या सर्वात चविष्ट, गोड पदार्थांपैकी एक म्हणजे पुरणपोळी. गूळ आणि चणाडाळ, बेसन मिसळून भरपूर तुपात शिजवलेल्या पुरणपोळीच्या चवीने तुमच्या नववर्षाच्या दिवसाची सुरुवात अगदी गोड होईल. गरम, ताजी आणि मऊ पुरणपोळीची एक प्लेट तुमच्या गुढीपाडव्याच्या उत्सवात चैतन्य आणू शकते.
श्रीखंड
श्रीखंडाची रेसिपी वापरल्या जाणाऱ्या टेकनिकनुसार ठिकठिकाणी वेगळी असू शकते. परंतु, दह्याचा प्राथमिक वापर या पदार्थाला समृद्धता देतो. उन्हाळ्यात तुम्ही त्याच डिशचे आंब्याचे व्हर्जनदेखील तयार करू शकता.
क्रिस्पी साबुदाणा वडा
जेव्हा शाकाहारी स्नॅक्सचा विचार केला जातो, तेव्हा क्रिस्पी साबुदाणा वड्याची आठवण होते. हा वडा बनवण्यासाठी सर्वात सोपाच नाही तर सर्वात स्वादिष्टदेखील आहे. तुम्हाला फक्त बटाटा आणि साबुदाण्याची गरज आहे आणि तुमचं काम झालंच म्हणून समजा. तुम्ही त्यांना तळू शकता, पण जर तुम्ही हेल्दीयर वर्जन शोधत असाल तर त्यांना बेक करणेदेखील कमी मजेदार नाही.
काजू मोदक
वाफवलेल्या मिष्टान्नाच्या रूपात मोदकाला त्याच्या भव्य चवीमुळे, त्याच्या आकर्षक आकारामुळे आणि स्वयंपाकाच्या तंत्रामुळे खाद्य जगात खूप प्रसिद्धी मिळाली आहे. काजू मोदक हा महाराष्ट्रातील विविध सणांमध्ये, विशेषतः गणेश चतुर्थी आणि गुढीपाडव्याला आस्वाद घेतला जाणारा एक स्वादिष्ट पदार्थ आहे. हा आंबा, चॉकलेट आणि अगदी नारळ अशा विविध घटकांचा वापर करून तयार केला जाऊ शकतो.
बटाटा वडा
महाराष्ट्रात खूप चविष्ट पदार्थ आहेत. बटाटा वडा हा एक असा पदार्थ आहे, जो मूळचा महाराष्ट्राचा आहे आणि राज्याबाहेरही लोकांच्या मनात त्याने स्थान निर्माण केले आहे. साधारणपणे बेसनच्या पिठात मसालेदार बटाट्याचे फिलिंग भरून बनवलेला बटाटा वडा हा गुढीपाडवा साजरा करताना चहाच्या वेळी वापरला जाणारा सर्वोत्तम नाश्ता असू शकतो.
नारळाचे लाडू
या वर्षी तुमच्या गुढीपाडव्याच्या उत्सवात पौष्टिकतेची भावना आणण्यासाठी हे स्वादिष्ट आणि अतिशय सोपे नारळाचे लाडू तयार करा. बनवण्यासाठी सर्वात सोप्या मिष्टान्नांपैकी एक असलेले नारळाचे लाडू करण्यासाठी तुमच्याकडे नारळाचे तुकडे आणि कंडेन्स्ड मिल्क यासह फक्त थोडा वेळ असण्याची गरज आहे.
कोथिंबीर वडी
आणखी एक महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी हे कोथिंबिरीच्या पानांचा वापर करून बनवलेला पदार्थ आहे. पाने प्रथम वाफवली जातात आणि नंतर त्यात भरपूर मसाले घालून तळली जातात. ही पाने एकत्र केली जातात आणि नंतर वेजेसच्या आकारात तळली जातात. या सणात कोथिंबीर वडी ही पूर्णपणे शाकाहारी रेसिपीदेखील आवर्जून वापरून पहावी.