Gudi Padwa 2022, Marathi New Year : चैत्र शुद्ध प्रतिपदेला येणार गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण आहे. या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. या सणानिमित्त घरोघरी गुढ्या उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं. शुभ मुहूर्त असल्याने सोनं, नव्या वस्तू खरेदी केल्या जातात. ठिकठिकाणी शोभायात्रा काढून जल्लोषात स्वागत केलं जातं. परंतु अनेकदा आपल्या लांबच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रीणीना भेटणं होत नाही म्हणून मग त्यांना मेसेज पाठवून शुभेच्छा दिल्या जातात. यासाठीच आम्ही तुमच्यासाठी खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नविन दिशा, खुप आशा,
नविन सकाळ, सुंदर विचार,
नविन आनंद, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नविन वर्ष..
Happy Gudi Padwa!

दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू..
Happy Gudi Padwa!

श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान..
आमच्या सर्वांच्या तर्फे
हार्दिक शुभेच्छा!
हॅप्पी गुढी पाड़वा..!

दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू..
Happy Gudi Padwa!

गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
नूतन वर्षाभिनंदन!

गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईमधील गिरगाव येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन बघा व्हिडीओ

(क्रेडीट: सोशल मीडिया)

मराठीतील सर्व गुढी पाडवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gudi padwa 2022 special greetings marathi wishes messages image ttg