विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे गुढीपाडव्या निमित्त आयोजित शोभायात्रेस हजेरी लावली. यावेळी त्यांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फडणवीस म्हणाले, “श्रीराम नवमीच्या महोत्सवाची देखील सुरुवात एकप्रकारे आजपासून आपण केली आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. की या संपूर्ण करोनाच्या काळात आपले आराघ्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या मंदिरासाठी, यांच्या जन्मस्थानासाठी ५०० वर्षे आपण सर्वांनी संघर्ष केला. त्या प्रभू श्रीरामाचं मंदिर हे अयोध्येला ज्या ठिकाणी रामलल्लाचा जन्म झाला, त्याच ठिकाणी बांधण्यासाठी त्याचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आणि आज भव्य मंदिराचं निर्माण हे त्या ठिकाणी होतय. ही आपल्या सारख्या सगळ्या रामभक्तांसाठी देखील अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.”

Gudi Padva 2022 Live : राज्यभर ‘निर्बंधमुक्त’ गुढी पाडव्याचा उत्साह; मुंबई-ठाण्यात शोभायात्रांचा जल्लोष!

तसेच, “मला असं वाटतं की ज्याप्रकारे आपल्या देशात एक नवचैतन्य आता आपल्याला पाहायला मिळतय आणि पहिल्यांदा आपल्या अस्मितेला एक नव तेज आपल्या देशात ज्या प्रकारे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आपल्याला येताना दिसतय. त्याचा खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना अतिशय मनापासून आनंद आहे आणि म्हणून आजच्या या नववर्षाच्या निमित्त मी एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करीन, की आपल्या सर्वांना ईश्वराने अतिशय सुख,समाधान, आरोग्य, ऐश्वर्य द्यावं. सगळ्यात महत्वाचं आपल्यासह संपूर्ण भारतला आणि विश्वाला आरोग्याचा आशीर्वाद ईश्वराने द्यावा आणि येणारी वर्षे ही आपल्या सर्वांना अतिशय आरोग्यदायी जावी, अशी ईश्वराला प्रार्थना करतो. आपल्या देशाला देखील ईश्वराने आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. ” असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व गुढी पाडवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leader of opposition devendra fadnavis wished gudipadva msr