Guru Purnima 2022 Wishes in Marathi: आज १३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. आषाढी पौर्णिमेलाच गुरूपौर्णिमा असेही म्हणतात. धर्मग्रंथानुसार वेदांचे लेखक महर्षी वेद व्यास यांचा जन्म गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाला होता. त्यामुळे महर्षी वेद व्यास यांच्या जन्मापासून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजेची परंपरा शतकानुशतके सुरू आहे. असं म्हणतात की वेदव्यासांनी मानवजातीला सर्वात आधी चार वेदांचे ज्ञान दिले. त्यामुळे या दिवशी आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेणे शुभ मानले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे आशीर्वाद घेण्यासोबतच आपल्या गुरूंना  विशेष संदेश पाठवून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता. (Marathi Wishes, Images, WhatsApp Status, Greeting)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे मराठी संदेश –

गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरू ब्रह्मा गुरू विष्णु,

गुरु देवो महेश्वरा

गुरु साक्षात परब्रह्म,

तस्मै श्री गुरवे नमः

Guru Purnima 2022 Puja Vidhi: जाणून घ्या गुरुपौर्णिमेचा शुभ योग, मुहूर्त आणि पूजा पद्धती

गुरू जगाची माऊली

जणू सुखाची सावली

गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

होवो गुरु चरणाचे दर्शन,

मिळे आनंदाचे अंदन,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

Guru Purnima 2022 : गुरु पौर्णिमेला आपल्या राशीनुसार करा ‘या’ वस्तूंचे दान; पूर्ण होतील सर्व मनोकामना

गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड,

लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,

शहाणे करुन सोडी, सकळं जना,

तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru purnima 2022 wishes greetings gif status sms whatsapp status in marathi hrc